CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : रेल चाईल्ड संस्थेच्या कल्याण व डोंबिवली मधील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून यंदाचा 'गुणवंत खेळाडू पुरस्कार २०२३-२४' हा रेल चाईल्ड संस्थेच्या महात्मा गांधी विद्यामंदिर, डोंबिवली पश्चिम शाळेतील इयत्ता ६ वी मध्ये शिकणारी विद्यार्थीनी सई दिनकर सोमासे या विद्यार्थीनीने पटकाविला. रेल चाईल्ड संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते अंकुर आहेर यांच्या मातोश्री तसेच दिवंगत क्रीडा शिक्षीका सुमन भिकाजी आहेर स्मरणार्थ, 'गुणवंत खेळाडू पुरस्कार' म्हणून प्रमाणपत्र व रुपये ७००० प्रदान करण्यात येतात.
शनिवार ३० नोव्हेंबर रोजी रेल चाईल्ड संस्थेच्या सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार सभागृहात विवेक द्याहाडराय यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार सई दिनकर सोमासे हिला प्रदान करण्यात आला. याप्रसंगी रेल चाईल्ड संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीधर पटवर्धन, कार्यवाह दिलीप झरकर, सरस्वती मंदिर प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष मुजुमदार, माध्यमिक शाळा समिती अध्यक्ष विनायक पहाडे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते अंकुर आहेर, महात्मा गांधी विद्यामंदिर माध्यमिक मुख्याध्यापक सुरेश बोरसे, प्राथमिक मुख्याध्यापक अजयकुमार जोगी, संधीचे वडिल दिनकर सोमासे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
अंकुर आहेर यांनी मार्गदर्शन करताना, मातोश्रींच्या आठवणींना उजाळा दिला. पालकांनी आपल्या पाल्यांना ऑलिंपिक मान्यताप्राप्त खेळांमध्ये सहभाग वाढविला पाहिजे. खेळाडूंना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर कोणकोणते पुरस्कार दिले जातात याबद्दल माहिती दिली. विवेक द्याहाडराय यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची खेळातील गुणवत्ता वाढविण्यासाठी पालकांचे प्रबोधन करण्याचा मानस व्यक्त केला. दिलीप झरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन केले. सई सोमासे हिला पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बोरसे, वर्गशिक्षिका लता कोळी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.