CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात विश्वनाथ भोईर व्यस्त

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

कल्याण : कल्याण पश्चिम मतदार संघाचे महायुतीकडून उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत रोड शो सुद्धा झाला या रोड शोला मिळालेल्या प्रतिसादा नंतर विश्वनाथ भोईर यांनी मतदारसंघातील मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला असून ते त्यांच्याशी संवाद साधत आहे.

महायुतीच्या सरकारमुळे कल्याण पश्चिम मतदार संघातील पायाभूत सोयी सुविधांसाठी भरघोस निधी मिळाला त्यातून विविध विकास कामे केली तसेच काही कामे प्रगतीपथावर आहेत शहरातील पाण्याची गरज लक्षात घेता कल्याणकरांची तहान भागवण्यासाठी नवे धरण महापालिकेस द्यावे अशी मागणी केली आहे.

त्याचबरोबर कल्याण पश्चिमेत सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे .असे विश्वनाथ भोईर यांनी सांगितले त्यांनी खडकपाडा चौकातून प्रचाराला सुरुवात केली .खडक पाडा, वायाले नगर ,गोदरेज हिल, आदी भागासह उंबर्डे आणि कोळवली भागातून त्यांनी प्रचार केला शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले यांची भिवंडी लोकसभा जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर वकील गुरुनाथ भुंडेरे यांची कल्याण पश्चिम आणि मुरबाड मतदार संघासाठी समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.