CRIME BORDER | 20 December | 01:50 PM
कोराना व्हायरसविषयी निष्काळजीपणाने वागून इतरांचा जीव धोक्यात टाकल्याबद्दल निर्माते अशोक पंडीत यांनी गायिका कनिका कपूरला चांगलेच फटकारले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘लाज वाटते कनिका तुझी. लंडनहून भारतात परतीस तेव्हा तुला करोनाचा संसर्ग झाल्याचे तू सर्वांपासून लपवलेस. तू एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सहभागी झालीस. तेथे उपस्थित असलेल्या 100 लोकांच्या संपर्कात आलीस. आता तू कोरोनाची चाचणी केलीस आणि ती पॉझिटिव्ह आली. तू इतर लोकांचे आयुष्य देखील धोक्यात टाकले आहेस.’
आयसोलेशन वॉर्डमध्ये आहे कनिका
'बेबी डॉल' आणि 'चिट्टियां कलाइयां' या गाण्यांची गायिका कनिका कपूरची कोरोनाव्हायरस टेस्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आली. तिला लखनऊमधील एका रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे. वृत्तानुसार लंडनमधून परत आल्यानंतर ती सुमारे 500 लोकांच्या पार्टीत सहभागी झाली होती. लखनऊच्या किंग जॉर्ज हॉस्पिटलमधूनही कनिकाचा रिपोर्ट समोर आला आहे. त्यात 4 जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. चौथे नाव कनिकाचे आहे. पण अहवालात तिचे वय 28 लिहिले गेले आहे, तर विकिपीडियानुसार ती 41 वर्षांची आहे. जेंडर कॉलममध्येही तिच्या नावापुढे एम (मेल) लिहिलेले आहे.
कनिका स्पष्टीकरण देताना म्हणाली - मी कोणतीही पार्टी दिली नाही, 4 दिवसांपासून सेल्फ क्वारंटाइनमध्ये आहे
भास्करने कनिकाला याबाबत विचारले असता ती म्हणाली की, "मी लंडनमध्ये राहते आणि भारतात काम करते. मला तीन मुलं असून ती लंडनमध्ये शिकतात. मी दर महिन्याला 10 दिवसा त्यांची भेट घ्यायला जाते. मी लंडनमध्ये फेब्रुवारीच्या शेवटापासून 9 मार्चपर्यंत होते. मी कामानिमित्त भारतात आले. येथे सर्व काही बंद असल्यामुळे मी लखनऊतील माझ्या आईवडिलांकडे गेले होते. मी कोणतेही पार्टी केली नव्हती कारण अशा परिस्थितीत कोण पार्टीत येईल? ही पार्टी करण्याची योग्य वेळ नाही. मी पार्टी केल्याच्या आलेल्या सर्व बातम्या खोट्या आहेत.
10 दिवसांपूर्वी मी मी भारतात परतल्यानंतर विमानतळावर नार्मल प्रोसिजरद्वारे 10 दिवसांपूर्वी माझी स्कॅनिंग केली होती. 4 दिवसांपूर्वी माझ्या लक्षणे दिसून आली. मागील चार दिवसांपासून मला फ्लू होता. मी तपासणी केली. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब क्वारंटाइन झाले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांची मॅपिंग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मी येथील सर्व हेल्पलाइनवर कॉल करून माझी टेस्ट घेण्यास सांगितले. मात्र त्यांनी मला टेस्टची गरज नसल्याचे म्हणत मला स्वतःला 14 क्वारंटाइन होण्यास सांगितले. मी चार दिवसांपासून खोलीच्या बाहेर पडली नाही. मी सीएमओला विनंती केल्यानंतर माझी तपासणी करण्यात आली. आता मी हॉस्पिटलमध्ये आहे. मला खूप सौम्य आजार झाला आहे. मी कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले नव्हते किंवा कोणत्या पार्टीत सहभागी झाले नव्हते. तसेच मी कोणतीही पार्टी दिली नाही."