CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : (राजेंद्र वखरे ) :-आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाने महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात त्यांचे उमेदवार मैदानात उतरवले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमुद्रे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना व भाजपा यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की ह्या पार्ट्या सर्व खोट्या आश्वासन देणाऱ्या आहेत आणि विकासाच्या नावावर हे भ्रष्टाचार फैलावणारे आहेत.
ते पुढे म्हणाले की भाजपा आणि शिवसेना सरकार जनतेला विकासाच्या नावावर ठगवत आहे. जनतेसमोर अनेक प्रश्न आ वाचून उभे आहेत रस्ते ,वीज ,पिण्याचे पाणी रस्त्यांचे प्रश्न. तसेच एकाच रस्ता पुन्हा पुन्हा बनवून त्यामध्ये भ्रष्टाचाराला बढावा देण्याचे काम हे सरकार करीत आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करताना सांगितले की कल्याण ग्रामीण 144 विधानसभा क्षेत्रातून ते स्वतः पक्षाचे अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमुद्रे निवडणूक लढवणार आहेत.
तर कल्याण पूर्व 142 मधून भाजपाच्या सुलभा गायकवाड यांच्या विरोधात युवा उमेदवार नाना गायसमुद्रे हे निवडणूक लढवणार आहेत. तर कल्याण पश्चिमेतून जयपाल कांबळे मुरबाड विधानसभा क्षेत्रातून आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात गंगाराम मुकणे हे पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.त्याचबरोबर कळवा मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजय श्याम मोरया आणि भिवंडी मधून खान इस्लाम इकबाल (अरबाज भाई) निवडणूक मैदानात आहेत.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गायसमुद्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आम्ही ही निवडणूक भ्रष्टाचार संपवण्यासाठी तसेच विकासाची गंगा आणण्यासाठी त्याचबरोबर भ्रष्टाचार मुक्त सरकार स्थापित करण्यासाठी निवडणूक लढवीत आहोत त्यांनी मतदारांना आवाहन केले आहे की त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या भ्रष्ट कारभाराला न निवडता परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकावे पक्षाची ही निवडणूक जनतेच्या हितासाठी असून जनतेचा विकास आणि शेवटच्या पायरीपर्यंत योजना राबवण्यासाठी व पारदर्शक कार्य करण्यासाठी जनतेने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.