CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (स्पोर्ट प्रतिनिधी) : डोंबिवली पश्चिमेत असलेली जी .एम .क्रिकेट अकॅडमी ही दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सर्व स्पोर्टच्या विद्यार्थ्यांसमवेत खेळाच्या साहित्याची पूजा करून यश संपादन होण्यासाठी तसेच खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याकरिता अकॅडमीचे मुख्य संचालक श्री. गोपाल श्रीयन सर हे परंपरेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात.
दसऱ्याच्या दिवशी सकाळी नऊ वाजता सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आर्थिक गुन्हे शाखा मुंबई चे पोलीस अधिकारी श्री . जयेंद्र भोयर साहेब यांच्या हस्ते तसेच प्रमुख अतिथी क्राईम बॉर्डरचे मुख्य संपादक तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री .राजेंद्र वखरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी पोलीस अधिकारी श्री . जयेंद्र भोयर साहेब व ज्येष्ठ पत्रकार श्री .राजेंद्र वखरे यांनी जी. एम. अकॅडमी चे कौतुक करत सदर अकॅडमीचे विद्यार्थी नक्कीच डोंबिवली शहराचे नाव शिखरावर नेतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य प्रशिक्षक गोपाल श्रीयन सर, तसेच प्रशिक्षक उमेश मांजरेकर सर, निवृत्त पोलीस अधिकारी समशेर पठाण सर , मंदार तांबे सर, जहीर खान सर , प्रवीण शिंगे सर , कॉमेंटेटर प्रसाद परब, अशोक भंजन तसेच पालक वर्ग नागरिक उपस्थित होते.
