CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे :- ठाणे शहर परिसरात थायलंड देशातील महिलांना वेश्या गमनासाठी तयार करून चांगल्या आर्थिक प्राप्तीचे आम्हीच दाखवून परदेशातून बोलावून घेऊन त्यांच्याकडून सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन 17 उल्हासनगर तीन येथे वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची बातमी खंडणी विरोधी पथकास मिळाली होती.
सदर बातमीचे आधारे खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी एसीपी शेखर बागडे शोध एक गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेश पवार व पथकाने 2 ऑक्टोबर 2024 रोजी ०१.१० वाजता सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन 17 उल्हासनगर तीन येथे बनावट ग्राहक पाठवून छापड घातला असता सदर लॉज मध्ये मॅनेजर नामे कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग व 37 वर्ष राहणार सितारा लॉजिंग अँड बोर्जिंग बोर्डिंग सेक्शन 17 उल्हासनगर नंबर तीन याच्यासह चार कामगार यांना ताब्यात घेऊन 15 ताई बळीत महिलांची सुटका करण्यात आली आहे सदर कारवाई दरम्यान नमूद लॉज मधून पाच लाख 27 हजार रुपये रोख व साधने जप्त करण्यात आलेली आहे.
सदर लॉजिंग व बोर्डिंगचे मॅनेजर व तेथे काम करणारे चार कामगार यांच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता १४३(१),१४३(३)सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४, व ५ प्रमाणे दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण ,पोलीस सह आयुक्त ठाणे शहर डॉ. पंजाबराव उगले ,अपर पोलीस आयुक्त ,(गुन्हे) ठाणे शहर शिवराज पाटील ,पोलीस उप आयुक्त (गुन्हे) ठाणे राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त शोध २, गुन्हे शाखा ठाणे ,शेखर बागडे सहायक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे शाखा ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणीविरोधी पथक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेश पवार, सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे ,पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सुभाष तावडे , पोलीस हवालदार संजय राठोड , सचिन शिंपी , महिला पोलीस हवालदार शितल पावसकर ,चालक पोलीस नाईक भगवान हिवरे ,पोलीस शिपाई तानाजी पाटील ,अरविंद शेजवळ यांच्या पथकाने केली.