CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

विष्णुनगर पोलीस स्टेशन मध्ये सत्यनारायण, भाविकांनी घेतला पूजा व महाप्रसादाचा लाभ, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली ( राजेंद्र वखरे) -: गणरायांचे आगमन होऊन पाच दिवसाच्या सात, दिवसाच्या गणरायांना व गौरी गणपतींना भाविकांनी मनोभावे निरोप दिला व पुढच्या वर्षी लवकर या असा अर्जव करीत अनेक ठिकाणी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.

यावेळी विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली पश्चिमेत सत्यनारायण पूजेचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी आयोजन केले होते . यांचा मूळ उद्देश असा होता की ,चोहीकडे आनंदी आनंद नांदायला हवा, राष्ट्रीय एकात्मता जोपासली जावी पोलीसातील व जनतेतील दरी दूर व्हावी. या उद्देशाने बाप्पांचे आगमन झाले .

यावेळी दर्शनाचा,पूजेचा व महाप्रसादाचा लाभ अनेक भक्तांनी घेतला तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी व भाविकांनी भक्ती भावाने हजेरी लावली. पोलीस ठाण्यातील वातावरण अतिशय सात्विक व भाविकांनी लावलेल्या हजेरीने दुमदुमून गेले. यावेळी विविध पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दर्शनाचा लाभ घेतला

विशेष म्हणजे विष्णूनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून ज्यांचे आदराने नाव घेतले जाते तसेच नागरिकात व पोलीस ठाण्यात प्रचंड लोकप्रिय असलेले तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व हल्ली कल्याण ट्रॅफिक चे एसीपी संजय साबळे यांनी भेट दिली. त्याचबरोबर डोंबिवली विभागाचे शिस्तप्रिय एसीपी सुहास हेमाडे यांनी भेट दिली व सर्वांचे कौतुक केले.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.v2