CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
शामराव पेजे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. ठाणे यांची शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना पुढीलप्रमाणे आहे.
योजनेचा उद्देश व स्वरूप - इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता बँकेमार्फत मंजूर केलेल्या रू.20.00 लक्ष पर्यंत कर्ज रकमेवरील व्याज परतावा (कमाल 12 टक्केपर्यंत) महामंडळाकडून वितरीत केला जाईल.
1. राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी - महत्तम कर्ज मर्यादा रू.10.00 लक्ष पर्यंत.
2. परदेशातंर्गत (Foreign) अभ्यासक्रमासाठी - महत्तम कर्ज मर्यादा रू.20.00 लक्ष पर्यंत.
लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती -
1.अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे.
2.अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
3.अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता रू.8.00लक्ष पर्यंत असावी.
4.अर्जदार हा इयत्ता 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60% गुणांसह पदविका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक.
5.अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर 0, -1 (म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा किमान 500
पेक्षा जास्त असावा.
कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे -
1.अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील (OBC) जातीचा दाखला.
2. रू.8.00 लक्ष पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार कार्यालयाकडून निर्गमित केलेला)
3. महाराष्ट्र रहिवासी (वय अधिवास) दाखला (तहसिलदार कार्यालयाकडून निर्गमित केलेला)
4.अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड
5. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट फोटो
6. शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परिक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका.
7.अर्जदाराचा जन्माचा / वयाचा पुरावा
8.शैक्षणिक शुल्क संबधित संस्थेचे पत्र.
9.आधार संलग्न बँक खाते पुरावा.
10.मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा.
11.शिष्यवृत्ती (Scholarship), शैक्षणिक शुल्कमाफी (Free ship), पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र.
12. तसेच इतर आवश्यक कागदपत्रे.
कार्यपद्धती
ही योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर नोंद करणे आवश्यक आहे.
शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत येणारे अभ्यासक्रम -
अ.राज्यांतर्गत येणारे अभ्यासक्रम -
1.आरोग्य विज्ञान - MBBS, BDS, BAMS, BHMS, B. Pharm, व संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम.
2.अभियांत्रिकी - B.E, B.Tech., B. Arch (सर्व शाखा), तसेच संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम इ.
3.व्यावसायिक अभ्यासक्रम – LLB, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटेरिंग, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बॅचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, सनदी लेखापाल / कंपनी सचिव, पायलट, SHIPPING, MBA, MCA, विषयांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, इ.
4.कृषी अन्नप्रकिया व पशुविज्ञान - Animal & Fishery Sciences, B.Tech., BVSC (Bachelor of Veterinary Science), B.Sc. (कृषी व दुग्ध् विज्ञान) व संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम.
ब.देशांतर्गत अभ्यासक्रम - केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NACC मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य प्रात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता पुढे नमूद केलेल्या आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान या अंतर्गत येणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
क. परदेशांतर्गत अभ्यासक्रम (Foreign Education)
1.आरोग्य विज्ञान- Doctor OF Medicine (MD), Master of Science (MS)
2.अभियांत्रिकी - Civil, Mechanical, Electrical, Computer, Biotechnology, Generic Engineering, Architecture, etc.
3.व्यावसायिक व व्यवस्थापन - MBA, Hotel Management, LLB, LLM.
4. विज्ञान - Agriculture, Horticulture, Generic Science, Maths, Physics, Chemistry, Botany, Zoology, etc.
5.कला (Art) - Fine Art, Film Making, Animation, Design, Fashion.
इतर अटी व शर्ती –
परदेशी अभ्यासक्रमांतर्गत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा लाभ घेण्याकरीता खालील आवश्यक कागदपत्रे अनिवार्य आहेत-
1.परदेशी शैक्षणिक संस्थेत परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थीकरिता QS (Quacquarelli Symonds) च्या रँकिंग / गुणवत्ता निकषांनुसार संस्थेचे स्थान 200 पेक्षा आतील असावे.
2. परदेशी अभ्यासक्रमाकरीता पात्रता परीक्षा (Graduate Record Exam- GRE), Test OF English as a Foreign Language (TOEFL) उत्तीर्ण विद्यार्थी.
व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी –
जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत व्याज परतावा मिळेल.अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमीत परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्याज रकमेचा परतावा (कमाल 12 टक्के पर्यंत) महामंडळ अदा करेल. व्याज परतावासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.
महामंडळाचा पत्ता व संपर्क :- शामराव पेजे इतर मागसवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. ठाणे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कळवा, ठाणे 2 रा मजला , दत्तवाडी स्वामी समर्थ मठासमोर, सह्याद्री शाळेच्या बाजूला खारेगाव, कळवा, ठाणे - 400605.
दूरध्वनी क्र.-022-20813625, भ्रमणध्वनी क्र.9869281787, 9226090909, 8793576503 ई-मेल :- dmobcthane@gmail.com / www.msobcfdc.org
ही योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर नोंद करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या वरील पत्यावर अथवा महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन ठाणे जिल्हा व्यवस्थपक (अ.का.) निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.
मनोज सुमन शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी
ठाणे