CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
वसई - : (निलेश चौधरी )-: २९ ऑगस्ट मेजर ध्यानचंद जन्मदिवस निमित्त दि. २५/०८/२४ रोजी वसई जि.पालघर येथे राजा शिव छत्रपती मार्शल आर्टस् असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर द्वारा आयोजित ७ वी राज्यस्तरीय राजा शिव छत्रपती मार्शल आर्टस् जूनियर - सीनियर चॅम्पियनशिप २०२४ आयोजित करण्यात आली होती. त्यात १२ जिल्ह्यांचा समावेश असून सर्वांनी उत्तम कामगिरी केली. तेथे शिव संकल्प शिवकालीन मर्दानी खेळ पथक, बुलढाणा यांच्या विद्यार्थ्यांनी विशिष्ट कामगिरी करत ११ खेडाळूंनी १० सुवर्ण पदक तर १ रौप्यपदक पटकावले तसेच या ग्रुप ने चतुर्थ ट्रॉफी प्राप्त केली.
प्राजक्ता चौधरी, ज्ञानेश्वरी कोल्हे, यश पराड, कार्तिक राजनकर , गणेश भुसारी, आयुष वाघमारे, हरिओम रामाने, निलेश शिवरकर, स्वराज शिंदे, बालाजी नवले यांनी शिवकालीन प्राचीन युद्ध खेळप्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले तसेच बालाजी नवले याने नियुद्ध खेळ प्रकारात रौप्यपदक प्राप्त केले. या विद्यार्थ्यांची निवड FIT- INDIA अंतर्गत होणाऱ्या राष्ट्रीय राजा शिव छत्रपती मार्शल आर्टस् स्पर्धेकरिता झाली आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांना तसेच आपले प्रशिक्षण भुषण सिरसार, सुहास राऊत आणि गौरव रायलकर यांना दिले.