CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
वरणगांव - (निलेश चौधरी ) -: गुत्रवार २३ ऑगस्ट हा दिवस वरणगांव परिसरासाठी काळ घेऊन आला. देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बसला काठमांडूजवळ भीपाण अपघात होऊन बसमधील २७ यात्रेकरुंच्या दुर्देवी मुत्यू झाला . भुसावळ तालुक्यातील वरणगांव, तळवेल, आचेगांव, दर्यापूर, पिपळगांव या गावांत घटनेने जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. नेपाळमध्ये घडलेल्या अपघाताने सर्वच जण धास्तावले.
मृत्यूमुखी पडलेले आणि अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची चिंता फार मोठी होती. या दुःखात प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षlताई खडसे यांनी राजकारण बाजूला ठेवत शुक्रवारी दुपारीच वरणगांव गाठले. मृतांच्या नातेवाईकांना घरी जाऊन त्यांना धीर देत शुक्रवारीच सांयकाळी संभाजीनगरहून विमानाने त्या रात्री ९:३० मि. दिल्लीला पोहचल्या.
पी.एम. मोदी यांच्याकडून विशेष परवानगी घेऊन त्या शनिवारी सकाळी नेपाळला पोहचल्या.तेथे पोहचल्याबरोबरच त्यांनी प्रथम जखमींची भेट घेतली. जखमींच्या परिवाराशी मोबाईलवरून संवाद साधला. मृतदेह जळगावला आणण्यासाठी त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी संवाद साधला. राजनाथसिंह यांनी लगेच प्रतिसाद दिला. मृतदेह आणण्यासाठी एअर फोर्सचे स्पेशल विमान उपलब्ध करुन दिले. एअर फोर्सचे विमान ओझर ( नासिक )येथे लॅडींग होईल असे ठरले होते.
रक्षाताई यांनी मृतदेह घेऊन एअर फोर्सचे विमान जळगांव विमानतळापर्यत नेण्याची विनंती केली. त्यामुळे रक्षाताईनी अगोदरच विशेष परमिट मिळविले होते. विमानात मृतदेह ठेवल्यानंतर सांयकाळी ५: १० मि. विमानाने काठमांडूहून उड्डाण केले.
असे ४८ पेक्षा जास्त भाविक होते. त्यांच्यासाठी गोरखपूर हून स्वतंत्र्य एसी कोचची व्यवस्था केली. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधला. परिस्थितीचे गांभीर्य सांगत विनंती केली. त्यांनी रेल्वे विभागाला सूचना दिल्या. त्या ४८ भाविकांचे रेल्वेचे भाडे स्वतः रहाताईनी भरले. गोरखपूर हुन ही ट्रेन शनिवारी रात्री १०:०० वा. भुसावळकडे निघाली. त्यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांच्या प्रयत्नांनी अपघातग्रस्तांना नुकताच धीर दिला नाही तर मी आहे ना तुमचे दुःख निवारण करण्यासाठी अशी जाणीव भाविकांना झाली. म्हणून असे म्हणावेसे वाटते की ताई, तुमच्या कार्यास क्राईम बॉर्डरचा सलाम.