CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नेपाळ मध्ये नदीत बस कोसळून २९ जणांना जलसमाधी,मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

वरणगांव : (निलेश चौधरी ):- भुसावळ तालुक्यातील वरणगांव, पिपळगांव, तळवेल, दर्यापूर या भागातले सर्व भाविक हे १५ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट पर्यत यांचा प्रवास होता.

वरणगांव परिसरातील ११० भाविकांचा ग्रुप हा १५ ऑगस्ट रोजी वरणगांव येथून प्रयागराजसाठी रेल्वेने प्रवास सुरु केला. ते गोरखपूर येथे पोहचले. गोरखपूर येथून त्यांनी सौरभ केसरवानी यांच्या तीन ट्रॅव्हलस बुक केल्या होत्या. त्यांनी अयोध्या, काशी, प्रयागराज फिरून आले . नंतर ते नेपाळच्या दिशेने पोखराहून काठमांडू कडे जाणारी भानिकांची बस दि. २३ रोजी शुक्रवार दुपारी ११.३० वा. उत्तर प्रदेश पासिंग बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले. ही बस ( यु.पी. - ५३एफ टी - ७६२३ ) या क्रमाकांची आहे. ही बस पोखरा येथून काठमांडू येथे जात होती. भरधाव वेगाने धावणारी ही बस तनहा जिल्हयातून पृथ्वीराज मार्गावरील मुगलिंग रोड खंड मास्यांगदी नदीत कोसळली मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलेला असल्याने अपघाताची तीव्रता वाढली. बसमधील काही प्रवासी हे वाहून गेले असण्याची भीती व्यक केली जात आहे.

ना. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे नेपाळकडे रवाना- केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षा खडसे व भुसावळ आ. संजय सावकारे यांनी आधी नेपाळमधील जखमी प्रवाशांची व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्यावेळी आ एकनाथ खडसे यांनी सुद्धा संपर्क साधला. ना. रक्षा खडसे व आ. संजय सावकारे वभाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे तातडीने नेपाळला रवाना झाले.

------------------

मुंबई : नेपाळला दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला अपघात झालाय. बस नदीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण 40 जण होते. नेपाळमधल्या पोखरा शहराकडून काठमांडूला जाताना हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये काही जण जळगावच्या भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव परिसरातले आहेत. या बस दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार संजय सावकारे हे नेपाळमध्ये दाखल झाले असून जखमींवर तातडीने उपचारासह मृतदेह भारतात परत आणण्यासाठी त्या प्रयत्न केले .

नेपाळ बस दुर्घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल या गावातील 24 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितले जात आहे. अयोध्या येथील राम मंदिर दर्शनानंतर भुसावळ तालुक्यातील 80 प्रवासी हे नेपाळ दर्शन सफारीसाठी निघाले होते. काठमांडूतून या बस जात असताना एक बस नदीत कोसळून मोठा अपघात झाला होता. अपघात झालेल्या बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी होते. त्यापैकी किती बचावले याचा निश्चित आकडा कळू शकला नव्हता. मात्र चोवीस जणांचे मृतदेह नेपाळ येथील बचाव पथकाला नदीतून काढण्यात यश मिळाले होते.

रक्षा खडसे यांनी घेतला अधिकाऱ्यांकडून आढावा

या मृतदेहांपैकी अनेकांची ओळख पटू शकलेली नाही. नातेवाईकांच्यामध्ये आपल्या परिजनांनाच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री रक्षा खडसे, आ संजय सावकारे आणि अमोल जावळे हे नेपाळकडे रवाना होऊन काठमांडू येथे दाखल झाले . भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव श्री ब्रिघू ढुंगाना यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आहे. घटनास्थळावरून तातडीने बचावकार्य पाहणी करण्यासोबत ते मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आज भारतीय लष्कराच्या विमानाने हे मृतदेह नाशिक विमानतळावर आणले असून त्यानंतर ते त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले जाणार आहेत.

हेल्पलाइन नंबर जारी

नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांच्या बसला झालेल्या अपघाताबाबत माहिती मिळवण्यासाठी काठमांडू स्थित भारतीय दूतावासाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. दूतावासाच्या अधिकृत एक्स अकाउंटवर हा नंबर जारी करण्यात आला आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी +9779851107021 जारी केलेला हेल्पलाइन नंबर आहे.