CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीच्या बॅनरखाली ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांचा वाढदिवस विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर) : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात नदीच्या तीरावर वसलेल्या रायते गावातील मूळ रहिवासी असलेले ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा वाढदिवस ५ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाने साजरे करतात.

श्री. नारायण सुरोशी हे राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी असून ते समितीच्या मार्फत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आदिवासी पाड्यावर वसलेल्या आश्रम शाळा व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य वाटप करीत असतात त्यांचा हा स्तुत्य उपक्रम समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, मुरबाड व अंबरनाथ तालुक्यातील विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा रायते येथील विद्यार्थ्यांना दप्तर बॅग, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. सरपंच सौ. स्मिता सुरोशी तर या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र घोडविंदे सर तसेच क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे तसेच श्री स्वामी सखा मासिकाच्या संपादिका तथा आश्रय महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सीमा वखरे त्याचबरोबर संतोष सुरोशी, नरेश सुरोशी ,हरेश पवार, रमेश सुरोशी, अमोल सुरोशी , पत्रकार रवींद्र जाधव ,समाजसेवक विजय सुरोशी, पत्रकार व समाजसेवक रशीद शेख तसेच परिसरातील गावकरी ,पोलीस पाटील ,आजी माजी सरपंच, उपसरपंच, मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका चित्रा बोरडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद, गावातील गावकरी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.त्यानंतर टिटवाळा येथील म्हस्कळ‌ येथे कार्यरत असलेल्या जीवन संवर्धन फाउंडेशन संचलित जीवन संवर्धन आश्रम शाळेतील सामाजिक समस्यांनी व्यथीत अशा बेगर मुलांचे पुनर्वसन करून आत्मनिर्भर समाजाच्या निर्मितीसाठी सुदृढ समाजमनाची युवाशक्ती निर्माण करणाऱ्या शाळेतीलविद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ पाटकर हे होते तर ज्येष्ठ पत्रकार सुदाम पाटील व श्री व सौ वखरे आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर अंबरनाथ येथील शिवभक्त आश्रम शाळा लव्हाळी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . यावेळी शिवभक्त आश्रम शाळा अंबरनाथ चे संस्थापक रमेश बुटेरे सर व मुख्याध्यापिका सायली रमेश बुटेरे व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध ठिकाणी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीच्या कार्याची कौतुक करत ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

s1