CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत अंमलबजावणी होणाऱ्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार DBT पोर्टलमार्फतच

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे, - सन २०२४-२५ पासून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत अंमलबजावणी होणाऱ्या सर्व योजनांचा लाभ हा लाभार्थ्यांना DBT पोर्टलमार्फतच देण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांचा आधार क्रमांक त्यांचे बँक खाते क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. ज्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक आहे, अशाच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करणे शक्य होणार आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यास्तरावरुन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेच्या अभ्यासाकडे आकर्षित करण्यासाठी संस्कृत भाषेची गुणवत्ता शिष्यवृत्ती वितरीत केल्या जातात. इयत्ता ८ वी मधील वार्षिक परीक्षेमध्ये संस्कृत या विषयात प्राप्त केलेल्या गुणवत्तेवर इयत्ता ९ वी व १० वो आणि इयत्ता १० वी च्या गुणवत्तेवर इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. शालेय शिक्षण विभाग क्रमांक एसकेई-१०९८/४२४०/(२२९/९८)/माशि- ८ दि.२० ऑक्टोबर १९९८ अन्वये संस्कृत शिष्यवृत्तीच्या संचात व दरात सुधारणा करण्यात आली आहे. इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी रुपये १०० दरमहा व इयत्ता ११ वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रुपये १२५ दरमहा शिष्यवृत्ती १९९८-९९ पासून दिली जाते. इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ही शिष्यवृत्ती मिळण्यास विद्यार्थ्यास संस्कृत विषय घेणे आवश्यक असते. इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी मध्ये प्रथम मंजूरीच्या वेळी ही शिष्यवृत्ती दहा महिन्यासाठी दिली जाते आणि इयत्ता १० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांस ही शिष्यवृत्ती १२ महिन्यासाठी दिली जाते.

संस्कृत शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असणाऱ्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. संस्कृत विषयातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावरच शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग करण्यात येते.

तरी सन २०२४-२५ पासून विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या बँक खाते क्रमांकावर शिष्यवृत्ती वितरीत करण्यात यावी. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी लिंक करुन घेण्याबाबतच्या सूचना देण्यात येत आहे, असे महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालनालय योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी कळविले आहे.