CRIME BORDER | 25 December 2025 | 11:07 PM
शहापूर येथे वास्तव्यास असलेले आणि डोंबिवलीतील प्रख्यात सर अकॅडमीमध्ये सलग २८ वर्षे निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाने कार्यरत राहिलेले स्वर्गीय रामभाऊ पाटील (प्रेमाने सर्वांच्या तोंडी ‘बाबू काका’)यांच्या आकस्मिक निधनाची बातमी सर अकॅडमीचे सर्वेसर्वा श्री. वीरचंद सरांकडून समजताच संपूर्ण सर अकॅडमी परिवार आणि आम्हा क्राईम बॉर्डर परिवाराला मोठा धक्का बसला.
बाबू काका हे केवळ कर्मचारी नव्हते, तर माणुसकी, स्नेह, शिस्त आणि कर्तव्यपरायणतेचे जिवंत उदाहरण होते. अकॅडमीतील हजारो विद्यार्थ्यांच्या घडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या साधेपणातही मोठेपण दडलेले होते.
अकॅडमीच्या प्रत्येक उपक्रमात, प्रत्येक क्षणी ते एक आधारस्तंभासारखे उभे राहिले. त्यामुळेच ते संस्थेचे एक अविभाज्य घटक बनले होते.त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणं अशक्य आहे — कुटुंबासाठी, अकॅडमीसाठी आणि त्यांच्या कार्याचा स्पर्श झालेल्या प्रत्येकासाठी.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो,आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शोकाकुल :
मुख्य संपादक राजेंद्र वखरे,
संपादिका सौ. सीमा वखरे,
क्राईम बॉर्डर परिवार, मुख्य संचालक श्री वीरचंद मैशेरी सर ,अकॅडमी परिवार, डोंबिवली – महाराष्ट्र.