CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज महानगरपालिका क्षेत्रात प्रशिक्षण सत्रांचे आयोजन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे,- जिल्ह्यात वेळोवेळी उद्भवलेल्या आपत्तींच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व जिल्हयातील आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था (मनपा, नप), जिल्हा परिषद यांच्या अधिनस्त विविध विभाग यांच्या सहकार्याने अनेक वेळा उद्भवलेल्या आपत्तीनंतर नागरिकांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी मदत घेतली जात आहे.

आपत्तीपूर्वी करावयाच्या उपाययोजना व विविध आपत्तींची अनुषंगीक माहिती जिल्ह्यातील नागरिकांना व विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संभाव्य आपत्तींच्या अनुषंगाने व आपत्तीपूर्व करावयाच्या उपाययोजना तसेच विविध आपत्तींबाबत “समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण” सत्र जिल्हा मुख्यालय, तालुकास्तरावर तसेच संबंधित विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसादर दलाचे सहकार्य घेण्यात येत आहे.

नियोजित प्रशिक्षण कार्यक्रम मान्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यास त्यामध्ये या कार्यालयाकडून आवश्यक बदल करण्यात येतील, असेही निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी कळविले आहे.

प्रशिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

ठाणे महानगरपालिका येथे दि. 8 जुलै 2024 रोजी आणि नवी मुंबई महानगरपालिका येथे दि. 9 जुलै 2024 रोजी अशाप्रकारचे प्रशिक्षण संपन्न झाले आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका (शहरी) - दि.१0 जुलै २०२४ रोजी सकाळी 11.00 ते 2.00, प्रशिक्षणाचे ठिकाण - नगर भवन, भाईंदर (पश्चिम).

उल्हासनगर महानगरपालिका (शहरी) - दि.11 जुलै २०२४ रोजी दुपारी ३.०० ते ६.००, प्रशिक्षणाचे ठिकाण - सी.एच.एम. कॉलेज, उल्हासनगर-३.

मुरबाड (ग्रामीण) - दि.१2 जुलै २०२४ रोजी सकाळी 11.00 ते 2.00, प्रशिक्षणाचे ठिकाण - जनसेवा शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय, महाविद्यालय शिवळे कॉलेज, शिवळे. दुपारी ३.०० ते ६.००, प्रशिक्षणाचे ठिकाण - एमआयडीसी हॉल, मुरबाड.

शहापूर (ग्रामीण) - दि.१3 जुलै २०२४ रोजी सकाळी 11.00 ते 2.00, प्रशिक्षणाचे ठिकाण - ग.वि. खाडे विद्यालय, शहापूर. दुपारी ३.०० ते ६.००, प्रशिक्षणाचे ठिकाण - विठ्ठल मंदीर, अहिल्याबाई होळकर हॉल, कसारा

कल्याण (ग्रामीण) - दि.१४ जुलै २०२४ रोजी सकाळी 11.00 ते 2.00, प्रशिक्षणाचे ठिकाण - महावीर इंग्लिश स्कूल, लाच चौकी, आग्रा रोड, कल्याण. दुपारी ३.०० ते ६.००, प्रशिक्षणाचे ठिकाण - बिरला स्कूल, कल्याण.

भिवंडी (ग्रामीण) - दि.१5 जुलै २०२४ रोजी सकाळी 11.00 ते 2.00, प्रशिक्षणाचे ठिकाण - पडघा ग्रामपंचायत हॉल, पडघा भिवंडी/बी.बी. पाटील इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कुरूंद, ता. भिवंडी. दुपारी ३.०० ते ६.००, प्रशिक्षणाचे ठिकाण - बी.एन.एन. कॉलेज, सायन्स आर्ट अॅण्ड कॉमर्स, धामनकर नाका, भिवंडी.

अंबरनाथ (ग्रामीण) - दि.१6 जुलै २०२४ रोजी सकाळी 11.00 ते 2.00, प्रशिक्षणाचे ठिकाण - महात्मा गांधी हायस्कूल, अंबरनाथ. दुपारी ३.०० ते ६.००, प्रशिक्षणाचे ठिकाण - आदर्श हायस्कूल कुळगाव-बदलापूर.

तरी या प्रशिक्षणात पत्रकार बांधवांनीही सहभाग घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ यांनी केले आहे.