CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे, - महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्य दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा, यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आलेली आहे.
या योजनेबाबत अधिक माहिती व योजनेचे अर्ज प्राप्त करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे, 4 था मजला, सामाजिक न्याय भवन, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, कळवा, ठाणे 400605 या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.