CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मोबाईल ॲप द्वारे लोन घेतलेल्या इसमाचे नातेवाईक व आजु-बाजुचे इसमांना नाहक त्रास देवुन त्यांना शिवीगाळ तसेच अश्लील भाषेत बोलणा-या टेली कॉल सेटरचा पर्दाफाश

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

मोबाईल ॲप द्वारे लोन घेतलेल्या इसमाचे नातेवाईक व आजु-बाजुचे इसमांना नाहक त्रास देवुन त्यांना शिवीगाळ तसेच अश्लील भाषेत बोलणा-या टेली कॉल सेटरचा पर्दाफाश तसेच ग्राहकाची फसवणुक करून त्याचे नावाने सिमकार्ड काढणा-या व्ही.आय. कंपनीचे प्रतिनिधीला खंडणी विरोधी पथकाकडुन अटक

ठाणे : चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन, ठाणे शहर गुन्हा रजि. नंबर 632/2024 भादवि कलम 504, 506, 509, 420, 34 प्रमाणे दिनांक 02/07/2024 रोजी दाखल आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी यांना त्यांचे मोबार्इल नंबरवर वेगवेगळया मोबार्इल नंबर वरून फोन करून त्यांचेशी आर्वाच्च भाषेत शिवीगाळी करून, त्याचेशी अश्लील भाषेत बोलुन त्यांचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले बाबत तक्रार दिली आहे. सदर बाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

प्रस्तुत गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषनामध्ये यातील फिर्यादी यांना त्याचे मोबार्इलवर कॉल येणा-या मोबार्इल नंबर धारक मंगेश हरेश सुतारे, वय 34 वर्षे, धंदा मासेमारी, रा. गोमा गल्ली, सुतारे हाऊस, रामले मार्ग, अंधेरी वर्सोवा, मुंबर्इ 61 यांना बोलावुन त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर मोबार्इल नंबर कधीही घेतले नसल्याचे सांगितले. त्याप्रमाणे वायरलेस कनेक्ट, मिनी स्टोअर्स, यारी रोड, अंधेरी पश्चिम येथील व्हीआय कंपनीचा प्रतिनिधी 1) राहुलकुमार टिळकधारी दुबे, वय 33 वर्षे, धंदा व्ही.आय. प्रतिनिधी, रा. रूम नंबर 401, सी 6, एच. डी. आय. एल. बिल्डीग विरार पुर्व याचेकडे चौकशी केली असता त्याने कंपनीने दिलेले टार्गेट पुर्ण करण्याकरीता त्याचेकडे येणा-या ग्राहकांची फसवणुक करून त्यांचे नावावर दोन ते तीन सिमकार्ड काढत असल्याचे सांगितले. त्यापैकी एक सिमकार्ड ग्राहकाला देवुन उरलेली सिमकार्ड त्याने लोन रिकव्हरी टेली कॉल सेंटर सिटीझन कॅपीटल पत्ता- ऑफीस 101, स्टार मनोर, को. ऑफ हौसिग सोसायटी, कॅबीन क्रॉस रोड, भांयदर पुर्व याना दिले असल्याचे सांगितले. नमुद आरोपीत यास दिनांक 03/07/2024 रोजी 23.55 वाजता अटक केली आहे. त्याप्रमाणे लोन रिकव्हरी टेली कॉल सेटर सिटीझन कॅपीटल, भांयदर येथे छापा टाकुन पुढील इसमाना ताब्यात घेवुन चौकशी केली असता कॉलसेंटर चालक /मालक 2) शुभम कालीचरण ओझा, वय 29 वर्षे रा. ए. विंग, 201 चंदन व्हॅली, शिवार गार्डनसमोर, मिराभार्इदर रोड, मिरा रोड पुर्व, ठाणे याने सदर सिमकार्ड हे लोन रिकव्हरी टेली कॉलीग करीता वापरलेले आहेत व टेलीकॉलर 3) अमित मंगला पाठक, वय 33 वर्षे, धंदा टेलीकॉलर, रा. वनरार्इ चाळ, रूम नंबर 05, राथोडी, मिरा मेडीकलजवळ, मालाड पश्चिम मुंबर्इ याचेकडे स्लार्इस फायनांस, कोटक बॅक, आयडीएफसी फस्र्ट बॅक यांचे लोन रिकव्हरीकरीता अॅग्रीमेंट करून देण्यात आले आहे. त्यांनी फिर्यादी यांनी कोणतेही लोन/कर्ज घेतलेले नसतानाही त्यांना फोन केले व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांचेशी अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील दोन्ही आरोपीना दिनांक 05/07/2024 रोजी 05.50 वाजता अटक करण्यात आलेली आहे. सदर तीनही आरोपींना दिनांक 10/07/2024 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे. सदर आरोपीनकडुन कॉम्पुटरमधील 4 एस.एस.डी.हार्डडिस्क, 1 जीएसएम गेटवे, 1 टीपी लिंक कंपनीचा 24 पोर्ट स्विच, 1 राऊटर, 3 मोबार्इल असा एकुण 77,300/- रूपये किमंतीचा माल हस्तगत केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि /सुनिल तारमळे नेम. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर हे करीत आहे.

ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेली कॉल सेंटर मधील इसम हे पुरूष व महीलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळी अथवा अश्लील भाषेत बोलुन त्रास देत असतील त्यांनी संबंधीत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.

सदरची कारवार्इ मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर. मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -2, गुन्हे शाखा, ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष कृती दल ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे, मपोनि/वनिता पाटील, सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/भुषण कापडनिस, सपोनि/श्रीकृष्ण गोरे, पोउपनिरी/विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाष तावडे, सपोउपनि/कल्याण ढोकणे, सपोउपनि/संजय बाबर, पोहवा/सचिन शिंपी, पोहवा/संदीप भोसले, पोहवा/आशिष ठाकुर, पोहवा/संजय राठोड, पोहवा/गणेश गुरसाळी, पोहवा/ योगीराज कानडे, मपोहवा/शितल पावसकर, चापोना/भगवान हिवरे, पोशि/तानाजी पाटील, पोशि/अरविंद शेजवळ, मपोशि/मयुरी भोसले, पोहवा/निलेश जाधव, पोशि/ढाकणे, चामपोशि/शार्दुल यानी केली आहे.