CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
मुंबई (संतोष कोळंबकर) : बोरिवली पश्चिम येथील योगीनगर ते शिवाजीनगर दरम्यान रिक्षा प्रवास करत असलेल्या सौ. साधना श्रीपाद खांडेकर, राहणार- विनी गार्डन, बोरिवली पश्चिम या महिलेची 2 लाख 22 किंमतीचे दागिने असणारी बॅग रिक्षातच विसरून राहिली.
याबाबत त्यांचे नातेवाईक रुग्वेद फडके हे एम.एच.बी पोलीस स्टेशनला आले. व त्यांनी याबाबत ट्राफिक पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव यांना याबाबत सांगितले. राहुल जाधव यांनी तात्काळ सदर रिक्षाचालकाचा शोध घेऊन तपास करून सदर रिक्षाचलकाकडून विसरलेली एअर इंडिया कंपनीची बॅग त्यामध्ये 1) सोन्याचे मंगळसूत्र 2) सोन्याचे कानातील रिंग 2) सोन्याचे अन्य छोटे दागिने असा एकूण 2 लाख 22 हजार किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग अवघ्या 1 तासातच प्रवशाला मिळवून दिली. त्याबद्दल सदर प्रवाशांनी जाधव व तेथील स्टाफचे कौतुक केले व मुंबई पोलिसांचे आभार मानले. यावेळी एम.एच.बी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर सर यांनी देखील पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव यांचे कौतुक केले.