CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
दिनांक १३/०६/२०२४ रोजी १८.०० वाजताचे सुमारास एक इसम चरस हा अंमली पदार्थ विक्री करीता टेमघर पाईपलाईन रोड लगत भिवंडी याठिकाणी येणार असले बाबत खंडणी विरोधी पथकास गुप्त बातमी प्राप्त झाली होती. सदर बातमीचे अनुशंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला असता यातील आरोपी अनिलकुमार श्रीमुखलाल प्रजापती, वय ४२ वर्षे , धंदा मॅकेनिक, रा. सचिन शेठ चाळ, रूम नंबर ३, रामु नगर, पाईप लाईन रोड, भिवंडी, जि. ठाणे मुळ रा. गाव दुसौती, पोस्ट सैदाबाद तहसिल हंडीया जि. प्रयागराज राज्य उत्तरप्रदेश यास 17,20,000/- रू किमंतीचा 1 किलो 720 ग्रॅम वजनाचा चरस या अंमली पदार्थासह ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर बाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर 1289/2024 एनडीपीएस कायदा कलम 8(क), 20(ब), ाा (क), 29 प्रमाणे दिनांक 14/06/2024 रोजी 04.05 वाजता दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी अनिलकुमार श्रीमुखलाल प्रजापती यास चरस हा अंमली पदार्थ विक्री करणार इसम अर्जुनकुमार जोखुलाल प्रजापती, वय 38 वर्षे , रा. गाव बिरगापुर, पोस्ट हनुमानगंज, तहसिल फुलपुर, जि. प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश यास प्रयागराज, उत्तरप्रदेश येथे तपास पथक पाठवुन त्यास ताब्यात घेवुन दिनांक 20/06/2024 रोजी अटक करण्यात आलेली आहे.
तसेच गुन्हयातील आरोपीत अर्जुनकुमार जोखुलाल प्रजापती याने चारस हा अंमली पदार्थ विक्री केलेला इसम नामे श्यामबाबु प्रल्हाद सरोज, वय 51 वर्शे, धंदा रिक्षा चालक, रा. ई 1, 35 सी 3, सेक्टर 8, नेरूळ नवी मुंबई मुळ राहणार गाव बेलहा सिंगमऊ, तहसिल हंडीया, जिल्हा प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेष यास नेरूळ नवी मुंबई येथे तपास पथक पाठवुन त्यास दिनांक 21/06/2024 रोजी अटक करण्यात आलेली आहे. यातील आरोपीत श्यामबाबु प्रल्हास सरोज याची दिनांक 24/06/2024 रोजी घरझडती घेतली असता त्याचे घरामध्ये 1,70,000/- रू किमंतीचा 170 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. याप्रमाणे नमुद गुन्हयात खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी एकुण 3 आरोपीना अटक करून त्याचेकडुन 18,90,000/- रूपये किमंतीचा 1 किलो 890 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि /सुनिल तारमळे नेम. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर हे करीत आहे.
सदर गुन्हयातील अटक केलेला मुख्य आरोपी अर्जुनकुमार जोखुलाल प्रजापती याचे विरूध्द खालील प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
अक्र पोलीस स्टेषन गुन्हा रजिस्टर नंबर व कलम
1 कैण्ट पोलीस स्टेषन, प्रयागराज, राज्य - उत्तरप्रदेष गुरन 166/2009 एनडीपीएस कायदा कलम 8, 20
2 कैण्ट पोलीस स्टेषन, प्रयागराज, राज्य - उत्तरप्रदेष गुरन 187/2009 युपी गैग अॅक्ट कलम 2, 3
3 हंडीया पोलीस स्टेषन, प्रयागराज, राज्य - उत्तरप्रदेष गुरन 46/2014 भादवि कलम 147, 323, 364, 452, 504, 506, एससी/एसटी कायदा कलम 3(1) 5
5 शांतीनगर पोलीस स्टेषन, ठाणे षहर गुरन 3001/2014 भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 सह मपोका 37(1), 135
सदरची कारवाई मा. आषुतोश डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर. मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -2, गुन्हे शाखा, ठाण, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, विषेश कृती दल ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली मालोजी शिंदे , व. पो. निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे, मपोनि/वनिता पाटील, सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/भूषण कापडनिस, सपोनि/ श्रीकृष्ण गोरे, पोउपनिरी/विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाष तावडे, सपोउपनि/कल्याण ढोकणे, पोहवा/आशिष ठाकुर, पोहवा/संजय राठोड, पोहवा/सचिन शिंपी , पोहवा/गणेश गुरसाळी, पोहवा/संदीप भोसले, पोहवा/ योगीराज कानडे, मपोहवा/शितल पावसकर, चापोना/भगवान हिवरे, पो . शि . तानाजी पाटील, पो . शि ./अरविंद शेजवळ, मपोशि /मयुरी भोसले, पोहवा/निलेश जाधव, पो . शि ./ढाकणे, चाम पो . शि .शार्दुल यानी केली आहे.