CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे, : – राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्री. एस.चोकलिंगम यांनी आज ठाण्यातील होरायझन स्कूल या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम स्ट्रॉंग रुमला भेट देवून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगिक तयारीची पाहणी केली.
ठाणे जिल्ह्यात येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर लोकसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशिन स्ट्रॉंगरुमध्ये ठेवण्यात येणार आहेत. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रुम होरायझन स्कूल येथे आहे. या स्ट्रॉंग रुमची पाहणी आज मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये आदीउपस्थित होते. यावेळी श्री. शिनगारे व श्रीमती जायभाये यांनी केलेल्या तयारीची माहिती दिली. श्री. चोक्कलिंगम यांनी स्ट्राँगरुमची व्यवस्था चांगली केल्याचे समाधान व्यक्त केले.