CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मतदान करा व दाढी कटिंग मध्ये २५ टक्के सवलत मिळवा, डोंबिवली नाभिक समाजाचे आवाहन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली ( क्राईम बॉर्डर ) : - नाभिक समाज संघटना डोंबिवली ई - ४४२ च्या वतीने मतदान जन-जागृतीसाठी केशकर्तनाच्या दरामध्ये २५ टक्के सूट देण्याची घोषणा नाभिक समाज संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष श्री बाबासाहेब राऊत, उपाध्यक्ष रमेश वखरे, सचिव मंगेश पोफळे, खजिनदार बाळा पवार, सह खजिनदार तुषार शिंदे , विश्वस्त आसाराम अतकरे , रईस सलमान आणि जेष्ठ पत्रकार तथा संघटनेचे सल्लागार राजेंद्र वखरे इत्यादींनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

सोमवार दिनांक २० मे रोजी कल्याण लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदानाचे प्रमाण हे कमी असल्यामुळे बऱ्याच वेळा लोकप्रतिनिधी निवडून देण्यामध्ये मतदात्यांचा सक्रिय सहभाग जाणवत नाही. मतदान हा आपल्याला भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क आहे परंतु अनेक नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करणे आवश्यक आहे. आपल्या मताच्या माध्यमातून आपला योग्य प्रतिनिधी निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाला मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी शासन अनेक प्रकारे जाहिरात करत आहे.याच गोष्टीची दखल घेऊन समाजाचाच एक महत्त्वाचा घटक म्हणून नाभिक समाजाने डोंबिवली परिक्षेत्रामध्ये राहणाऱ्या मतदारांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी मंगळवार दिनांक २१ मे रोजी केश कर्तन आणि दाढीच्या दरामध्ये 25 टक्के सवलत जाहीर केली आहे.

जी व्यक्ती मतदान करून येईल आणि मतदान केल्याची निशाणी म्हणून शाई असणारे बोट दाखवेल त्या व्यक्तीस केस कापणे आणि दाढी करणे या दरामध्ये २५ टक्के सूट देण्यात येणार आहे. नाभिक समाज हा समाजसेवेच्या प्रत्येक कार्यामध्ये नेहमीच आपला वाटा उचलतो या अनुषंगाने मतदार राजा मध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि लोक जागृतीच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने डोंबिवली नाभिक समाज संघटनेने हा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.