CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली :- दिनांक १७ एप्रिल २०२४ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास गणेश शिवाजी खनपट यांनी दिलेल्या खबरी वरून ते कामावरून घरी जात असताना कोळेगाव येथील मराठी शाळेच्या बाजूला पिंपळाचे झाडाखाली एक अनोळखी इसम वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष निपचित पडलेला दिसला असता समाजसेवक खनपट यांनी त्यांचे जवळ जाऊन त्यास उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही उठला नाही. त्यानंतर त्यांनी 112 वर कॉल पोलिसांना करून बोलवले नंतर पोलिसांनी सदर अनोळखी इसमास उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही उठला नाही म्हणून पोलिसांनी ॲम्बुलन्स बोलवून सदर इसमास शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवली पश्चिम येथे घेऊन गेले असता तेथील ड्युटीवरील डॉक्टरांनी सदर अनोळखी इसमास तपासून संध्याकाळी आठ वाजता दाखल करण्यापूर्वी मयत झाल्याचे घोषित केले .
याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ९४/२०२४ कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून मयत सदर इसमाचे वर्णन खालील प्रमाणे हिंदू धर्मीय ,पुरुष, वय अंदाजे ४० ते ४५, बांधा मध्यम, उंची ५०६ फ़ुट ,रंग गोरा ,चेहरा उभट , नाक सरळ, कपाळावर काळसर व्रण, डोक्याचे व दाढीचे केस वाढलेले ,काळे व पांढरे -
इतर वर्णन मिशी वाढलेली काळी व पांढरी ,अंगात नेसूस पांढरे रंगाचा सफारी शर्ट तपकिरी रंगाचे पॅन्ट अशा वर्णनाचा बेवारस मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटविण्याचे मानपाडा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी ए.पी. आय. संदीप गोरे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी ८७७९०९०२१५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.