CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (क्राईम बॉर्डर टीम ) :- ज्येष्ठ पत्रकार कै श्रीकांत टोळ यांनी स्थापन केलेल्या डोंबिवली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रवीण गोरे (संपादक सा. लव-अंकुश), कार्याध्यक्षपदी सुरेश गायकवाड (संपादक सा. ठाणे रायगड वार्ता) सरचिटणीस पदी बापू वैद्य ( दै.प्रहार), तर खजिनदार पदी देवेंद्र शर्मा ( दै दोपहर का सामना) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
डोंबिवली पत्रकार संघाची २०२४- २०२५ कार्यकारिणीची बैठक दि.१ मे २०२४ रोजी पार पडली. या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण गोरे म्हणाले की, डोंबिवली पत्रकार संघाला नावलौकिक मिळवून देण्यासाठी तसेच शहरातील समस्या पत्रकार संघाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
या पत्रकार संघात श्रीराम कांदू , संतोष गायकवाड, अजय निक्ते, मुरलीधर भवार, जान्हवी मौर्य, आकाश गायकवाड, प्रभू कापसे, बजरंग वाळुंज हे सदस्य आहेत.