CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डॉ .श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीत प्रकाशन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (राजेंद्र वखरे ) : - कल्याण लोकसभा शिवसेनेचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कारकीर्द कार्य अहवालाचे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्य मंदिरात दि. २१ एप्रिल रविवारी संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत लता एकनाथ शिंदे यांनी गेल्या दहा वर्षाच्या काळात त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. या सर्व विकास कामाचा लेखाजोखा विकास दशक ,दहा वर्ष प्रगतीची कल्याणच्या समृद्धीची. या कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्याचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत रविवारी २१ एप्रिल २०२४ रोजी डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच स्थानिक भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते .

गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत, तर अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मतदार संघातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी, विविध शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, कल्याण शिळफाटा रस्त्याचे सहा पदरीकरण ,ऐरोली काटई फ्री वे काटई अंबरनाथ रस्त्याचे काँक्रिटीकरण ,कल्याण रिंग रोड या महत्त्वाच्या मार्गाची उभारणी करण्यात आली आहे ,तर वाहन चालकांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी मोठा गाव मानकोली उड्डाणपूल कोपरगाव रेल्वे उड्डाणपूल ,शीळफाटा सहा पदरी उड्डाणपूल ,,पलावा उड्डाणपूल या महत्त्वाच्या उड्डाणपूलांची उभारणी झाली आहे . तर विठ्ठलवाडी कल्याण उन्नत मार्ग ,महामार्ग रिंग रोड ,कल्याण फाटा उड्डाणपूल यासारखी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहेत तर मतदार संघातील वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलून टाकणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रो पायाभरणी झाली असून येत्या दोन वर्षात मेट्रो नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

याचबरोबर आरोग्य क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी उल्हासनगर येथे मोफत रुग्णालय, कामगार रुग्णालयाची उभारणी , डोंबिवली येथे कॅन्सर आणि प्रसूती रुग्णालय अंबरनाथ येथे अत्याधुनिक रुग्णालय ,कल्याण डोंबिवली तसेच कळवा येथे विविध आरोग्य सुविधा उभारण्यात आले आहेत तर लवकरच अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार आहेत याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघात क्रीडा क्षेत्रात विविध सुविधांची उभारणी करण्यात आली आहे तसेच अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक भवनांचे देखील उभारणी झाली आहे .

खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात अशा विकसित झालेल्या या मतदारसंघातील विकास कामाचा सविस्तर आढावा विकास दशक दहा वर्ष प्रगतीची कल्याणच्या समृद्धीची या कार्य अहवालातून घेण्यात आला आहे.