CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

“…आणि मी ट्रेनमधून पडले”; मुक्ता बर्वेने सांगितला मुंबईत आल्यानंतरचा ‘तो’ अनुभव, म्हणाली…

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

मुक्ता बर्वेला एकेकाळी मुंबईत राहण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं."…आणि मी ट्रेनमधून पडले"; मुक्ता बर्वेने सांगितला मुंबईत आल्यानंतरचा 'तो' अनुभव, म्हणाली…

चित्रपटांमध्ये आव्हानात्मक भूमिका साकारत मराठी सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध ठिकाणी कामगिरी बजावत मुक्तानं तिचा एक मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. अभ्यासू, मेहनती, प्रामाणिक असे एक ना अनेक गुण बाळगत या मनोरंजनसृष्टीत मुक्तानं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच मुक्ताला एकेकाळी मुंबईत राहण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं.

अभिनेत्री मुक्ता बर्वेनं नुकतीच ‘राजश्री मराठी’च्या ‘तिची गोष्ट’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी चिंचवड-पुणे आणि मग मुंबईचा प्रवास सुरू झाला. यावेळी मुंबईत स्थिरावताना किती संकटं आली याबद्दल सांगताना मुक्ता म्हणाली, “मुंबईत मी मधुगंधामुळे आले. आजच्यापेक्षा २१-२२ वर्षांपूर्वी पुणे-मुंबई शहरं म्हणून थोडी लांब होती. पुणे शांत शहर आहे; पण मुंबईतली गर्दी, वेग पुण्यात नाही. मुंबईच्या हॉस्टेलमध्ये जागा मिळाली म्हणून मधूचा मला फोन आला. ती मला म्हणाली , की मुक्ते काय करतेयस. मी म्हटलं परीक्षा संपतेय उद्या माझी. मग ती म्हणाली, उद्या संपतेय ना मग परवा ये. मी म्हटलं कुठे, काय? मुंबईत एका हॉस्टेलमध्ये जागा झालीय आणि मी माझ्या मॅडमना सांगितलंय की, माझ्या एका मैत्रिणीला जागा हवीय, असं तिने सांगितलं. हो मला हवीय. मग मी परीक्षा संपवून मुंबईला आले. कुर्ल्याला त्या हॉस्टेलमध्ये मी अ‍ॅडमिशन घेतलं.”

“पण मुंबई एक अवघड शहर आहे. म्हणजे एकदा तुमचं झालं की सोप्पं आहे. पण माझा दिशांचा घोळ, ट्रेनची भीती ही होतीच. मी कुर्ला स्टेशनला पहिल्याच दिवशी ट्रेनमधून पडले होते. भीतीमुळे मी दाराच्या जवळ गेले. कुर्ल्याला उतरायला एवढी गर्दी होती. ट्रेन थांबायच्या aat सगळे आधी उतरतात ना. ज्या मागच्या बायकांना उतरायचं होतं, त्यांचा धक्का लागून मी पडले. पडले म्हणजे मी आडवीच होते. मग कोणीतरी मला उठवलं. माझ्या पाठीवर सॅक वगैरे होती आणि माझ्या मनात थोडी भीती बसली.पण हे घरी सांगायचं नाही हे मी ठरवलं. कारण- आपल्याला भीती वाटते हे सांगितलं, तर म्हणतील घरी ये. नको एवढं करू इथेच काहीतरी कर. पुण्यात हौशी नाटकं करं; पण आपल्याला करिअर करायचंय.” असं मुक्ता म्हणाली.“तेव्हा मला खूप सपोर्ट होता. मला नाटक मिळायच्या आधी मी दादर स्टेशनला पुलावर जाऊन उभी राहायचे. मी तेव्हा भूमिकांचा, गर्दीचा अभ्यास करायचे. ही माणसं आहेत आणि या माणसांमधले आता आपण एक माणूस होणार आहोत. याचा अभ्यास मी दीड आठवडा करीत होते. उभ राहायचं, बघायचं, खाली जायचं लिंबू सरबत प्यायचं, परत यायचं, बघायचं, ट्रेन पकडायची उलट-सुलट जायचं.” असं मुक्ताने नमूद केलं.

दरम्यान, मुक्ताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, मधुगंधा लिखित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या आगामी चित्रपटात मुक्ता झळकणार आहे. मुक्ता बर्वेसह नम्रता संभेराव, मायरा वायकुळ, सुप्रिया पाठारे, सुकन्या माने, सारंग साठ्ये, आशा ज्ञाते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट १ मे २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. sabhar lokstta