CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मुंबईतील एका हुक्का पार्लरवर पोलिसांची छापेमारी, मुनव्वर फारुकीसह १४ जणांना घेतलेलं ताब्यात, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

मुंबईतील एका हुक्का पार्लरवर पोलिसांची छापेमारी, मुनव्वर फारुकीसह १४ जणांना घेतलेलं ताब्यात, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

मुनव्वर फारुकीला मंगळवाी मध्यरात्री ताब्यात घेण्यात आलं होतं.बिग बॉस १७’ चा विजेता मुनव्वर फारुकीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री एका हुक्का पार्लरवर छापा टाकून काही जणांना ताब्यात घेतलं. त्यामध्ये स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. हुक्का पार्लरमध्ये अवैध सेवन होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती, त्यानंतर त्यांनी छापेमारी केली होती.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी छापेमारी करून काही जणांना ताब्यात घेतलं, त्यात मुनव्वर फारुकीच्या नावाचाही समावेश आहे. “आमच्या टीमला एका मुंबईतील एका हुक्का बारमध्ये हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही छापेमारी केली. तिथं सापडलेल्या वस्तूंची तपासणी केल्यानंतर काही लोकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मुनव्वर फारुकीचाही समावेश आहे,” अशी माहिती या छाप्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली आहे.

छापेमारीनंतर गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर्ट परिसरातील हुक्का पार्लरवर छापा टाकल्यावर ‘बिग बॉस १७’ चा विजेता मुनव्वर फारुकी व इतर १३ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या सर्वांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे हुक्का पार्लर बेकायदेशीरपणे चालवले जात होते. छापेमारीत ४,४०० रुपये रोख आणि १३,५०० रुपये किमतीचं सामान जप्त करण्यात आलं आहे. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनं कायद्याच्या कलमांतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.