CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डॉ .श्रीकांत शिंदे सध्या या मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून त्यांना पुन्हा दिल्लीत पाठवण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. परंतु, भाजपाच्या स्थानिक पातळीवरील विरोधामुळे त्यांचं नाव जाहीर होण्यास विलंब झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा ठरलेला कल्याण लोकसभा मतदारसंघात अखेर डॉ .श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. श्रीकांत शिंदे सध्या या मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून त्यांना पुन्हा दिल्लीत पाठवण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. परंतु, भाजपाच्या स्थानिक पातळीवरील विरोधामुळे त्यांचं नाव जाहीर होण्यास विलंब झाला. अखेर, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच माध्यमांसमोर डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील पेच संपुष्टात आला. दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला.\
डॉ .श्रीकांत शिंदे म्हणाले, “कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विषय क्लिअर होता. कल्याणमध्ये युतीचे कार्यकर्ते, नेत्यांच्या बैठका, गाठीभेटींना सुरुवात झाली आहे.मा. मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सगळे मिळून एकदिलाने कामाला लागले आहेत. प्रचाराला सुरुवात झाली आहे. मी फडणवीसांचं स्वागत करतो. कल्याण लोकसभेमधून मी मोठ्या मताधिक्क्याने जिंकून येईन.
कल्याण लोकसभा मतदारसंंघात श्रीकांत शिंदेंचा अपप्रचार
कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड समर्थक म्हणून मिरविणाऱ्या पण ते भाजपचे नसावेत, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात अपप्रचार केला जात आहे. यामुळे महायुतीत काही लोक घोळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कार्यकर्त्यांचा भाजपच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.