CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
Dombivli Crime border :- महात्मा गांधी विद्यामंदिर माध्यमिक डोंबिवली प. शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून एका सबळ समाजाची निर्मिती करण्याच्या हेतूने विज्ञान प्रदर्शन घेण्याची संकल्पना मुख्याध्यापक सुरेश बोरसे यांनी मांडली व शाळेच्या विज्ञान शिक्षक सुनील कांबळी व समीर भोईर यांच्या प्रयत्नांनी प्रत्यक्षात उतरली. विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन रेल चाईल्ड संस्था अध्यक्ष नितिन दिघे यांच्या हस्ते झाले.तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्था कार्यवाह भगवान सुरवाडे , शाळा समिती अध्यक्ष दिलीप झरकर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बोरसे तसेच पालकप्रतिनिधी म्हणून दिनकर सोमासे यांची उपस्थिती लाभली.प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.विज्ञान प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला . विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून नाविन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण अशा निरनिराळ्या प्रयोगांची मांडणी केली होती. क्षारयुक्त पाण्यातून वीजनिर्मिती, वैज्ञानिक खेळणी,नैसर्गिक दर्शके,ग्रहण टेलिव्हिजन व विविध अवयवांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी आपल्या उपजत कौशल्यातून बनवून सादर केल्या.
या विज्ञान प्रदर्शनतील इयत्ता ५ वी ते ७ वी च्या गटातून - प्रथम क्रमांक - सॉल्ट वॉटर लॅम्प (कु. वरद दीपक कोजगे -७ वी),द्वितीय क्रमांक - फन टॉय (तनिष राऊळ - ७ वी),तृतीय क्रमांक - श्वसन संस्था (कु.सई सोमासे, कु.अर्जुन बाठे - ५ वी) यांनी पटकावला तर,इयत्ता ८ वी ते ९ वी च्या गटातून प्रथम क्रमांक - नॅचरल इंडिकेटर (कु. तनिष्का सावंत -९ वी) द्वितीय क्रमांक - रॉकेट लॉन्चर (आर्यन रणदिवे, हर्ष भोईर,,निलेश चौधरी, श्रवण पंदेरे -९वी) तृतीय क्रमांक -लेजर सेक्युरिटी अलार्म (सर्वेश सावंत -८ वी) यांनी पटकावला. प्रयोग परीक्षण श्री किरण तळेले यांनी केले तसेच हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विज्ञान शिक्षक श्री सुनील कांबळी व श्री समीर भोईर सर यांनी मेहनत घेतल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक संस्था अध्यक्ष श्री नितिन दिघे ,कार्यवाह श्री भगवान सुरवाडे व शाळा समिती अध्यक्ष श्री दिलीप झरकर यांनी केले.
'विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेला प्रेरणा देणे आणि विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा आमचा हेतू सफल झाला ,' असे मत शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री सुरेश बोरसे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी व्यक्त केले.