CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

3 मार्चला राष्ट्रीय लोकअदालत

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे, :- ठाणे आयुक्तालयातील सर्व न्यायालयात दि.3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना लोकअदालत मध्ये तडजोडीअंती दंडाची रक्कम कमी करून त्यांच्या वाहनावरील खटले निकाली काढायची आहेत, त्यांनी येत्या 4 ते 5 दिवसात नजीकच्या वाहतूक उप विभागाशी संपर्क करून न्यायालयात आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी. जेणेकरून दि.3 मार्च 2024 रोजीच्या लोकअदालतच्या दिवशी न्यायालयात थकीत दंडाची रक्कम कमी होईल आणि आपल्या वाहनांवरील प्रलंबित खटले निकाली काढण्यात येतील. जे नागरिक दि.3 मार्च 2024 रोजी थेट न्यायालयात लोकअदालतीकरिता हजर राहतील, त्यांच्या थकीत दंडाची रक्कम कमी होणार नाही, पूर्ण रक्कम भरावी लागेल, याची नोंद घ्यावी, असे वाहतूक उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कसूरदार वाहन चालकांविरूध्द मोटार वाहन कायद्यान्वये दंड आकारला जातो. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंडाचे चलन वाहन चालकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते. जे वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात, अशा वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो. मात्र अशी अनेक प्रकरणे प्रलंबित असून, ती प्रकरणे निकाली काढण्यासाठी न्यायालयाकडून दर तीन महिन्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जाते. परंतू त्याला वाहन चालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे आणि वाहतूक विभाग, ठाणे शहर यांच्या वतीने नागरिकांना राष्ट्रीय लोक अदालतीचे महत्व पटवून देणे व त्यांच्याविरुध्द दाखल असलेल्या खटल्यांमध्ये तडजोड घडवून आणण्यास प्रयत्न करण्यासाठी मागील लोक अदालतीच्या कालावधीत पोलीस उपायुक्त (वाहतूक) कार्यालय, तीन हात नाका येथे हेल्पडेस्क सुरु केला होता. या कालावधीमध्ये जास्तीत जास्त वाहन चालक, सर्वसामान्य नागरिकांना लोक अदालत तसेच त्यांच्याविरुध्द दाखल खटल्यांमध्ये तडजोडीअंती दंडाची रक्कम कमी होईल, याचे महत्व पटवून देण्यात आले होते.