CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
नवीमुंबई :- मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आज कोंकण भवनात त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महसूल आणि इतर विभागाचे आधिकरी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळशास्त्री जांभेकरांनी 06 जानेवारी 1832 रोजी दर्पण या नावने पहिले मराठी वत्तपत्र सुरु करुन मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया रचला. बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारीता समाज प्रबोधन व लोकशिक्षणाचे ज्ञान देणारे विद्यापीठ होते. विधवा पुनर्विवाहाची चळवळ त्यांच्या लिखाणामुळे उभी राहिली. जांभेकरांनी 1840 मध्ये दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक सुरु केले.