CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे, :- मा. भारत निवडणूक आयोगाकडील दि.२९ मे २०२३ रोजीच्या निर्देशानुसार ०१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत दि. २३ जानेवारी, २०२४ रोजी ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात मतदारयादी अंतिमरित्या प्रसिध्दी करण्यात आलेली आहे.
या मतदारयाद्या मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तसेच सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात तपासणी करण्यासाठी उपलब्ध आहेत.
तरी सर्व नागरिक / मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची तपासणी करुन खात्री करावी. तसेच आपले / आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावाची मतदारयादीत नोंद नसल्यास नमुना नंबर ६, ज्या मतदारांच्या नावात / पत्त्यात दुरूस्ती असल्यास नमुना नंबर ८ तसेच कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत / कायमस्वरुपी स्थलांतरीत असल्यास नमुना नंबर ७ भरुन संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात जमा करण्यात यावा, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.