CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (विशेष प्रतिनिधी) : कु. श्वेता सुरेंद्रकुमार चौरसिया वय वर्ष १४, राहणार सहारा सोसायटी , किसन नगर , साई श्रद्धा चाळ नंबर ११, येडुसन, पाईपलाईन रोड डोंबिवली (पूर्व ) ,तालुका कल्याण, जिल्हा ठाणे हि विद्यार्थिनी शास्त्रीनगर हिंदी स्कूल डोंबिवली पश्चिम या शाळेत इयत्ता नववीत शिकत होती. ती दिनांक १३/१०/२०२३ रोजी शाळेत गेली असता कोणीतरी अज्ञात इसमाने तीला फुस लावून पळून नेले आहे.
![]()
त्या संदर्भात तिच्या आई-वडिलांनी विष्णूनगर पोलीस स्टेशन डोंबिवली पश्चिम येथे तक्रार दाखल केली असून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ३३२/२०२३ भा.द.वि. ३६३ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदर मुलीचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मोहन खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.जी.बी.देवरे करीत आहे.
कु. श्वेता चौरसिया आज पावतो मिळून आलेली नाही. सदर मुलगी मिळून आल्यास सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री.जी.बी देवरे यांचा मोबाईल क्रमांक ९८२३२२१२८४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन डोंबिवली विष्णुनगर पोलीसांनी केले आहे.