CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

तडीपार गुंडास कल्याण क्राईम ब्रांचने ठोकल्या बेडया

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : कल्याण क्राईम ब्रँचचे युनिट-३ चे पो.हवा.दत्ताराम भोसले यांना त्यांचे गुप्त बातमीदरा मार्फत बातमी मिळाली की,डोंबिवली पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड वरील नामचीन तडीपार केलेला गुंड सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते हा दत्तनगर प्रगती कॉलेजच्या समोर गार्डन जवळ डोंबिवली पूर्व हा या परिसरात हातात धारदार भला मोठा कोयता घेऊन फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच कल्याण क्राईम युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार साहेब यांना कळविताच त्यांनी तात्काळ त्याचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणे जाऊन कारवाई करण्याचे आदेश पथकातील स.पो.निरी.संतोष उगलमूगले,पो.उप.निरी. संजय माळी,पो.हवा.दत्ताराम भोसले,विश्वास माने,बालाजी शिंदे, मिथुन राठोड,गुरुनाथ जरग या पथकास दिले,लागलीच मिळालेल्या बातमीवरून सदर ठिकाणी विलंब न लावता जाऊन डोंबिवली पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील हद्दपार (तडीपार) इसम नामे सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते वय २८ वर्षे राहणार- दत्तनगर प्रगती कॉलेज जवळ डोंबिवली पूर्व हा पोलिसांना पाहून पळत असताना पाठलाग करून त्यास घातक हत्यार कोयत्यासह पकडले तसेच सदर हद्दपार (तडीपार) गुंड यास कल्याण-डोंबिवली परिमंडल-3,मधून दि. ०६/०६/२०२३ रोजी पासून ०८ महिन्या करिता हद्दपार (तडीपार) केले असून याचे वर घातक शास्त्राने वार करून दहशत माजवणे असे 3 गुन्हे,तसेच एन.डी.पी.एस.चा 1 गुन्हा असे एकूण ४ गुन्हे डोंबिवली पोलीस स्टेशन च्या रेकॉर्डवर दाखल असून त्याचे विरुद्ध डोंबिवली पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कारवाई करून ताब्यात देण्यात आले आहे.

तसेच वरील तडीपार गुंडास कल्याण क्राईम ब्रांचने युनिट - ३ ने त्यास पकडून कारवाई केल्याने सदर भागातील जनतेकडून पोलिसांचे कामगिरीच कौतुक होत आहे.