CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

६ जानेवारी मराठी पत्रकार दिन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

आचार्य बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली.

पाश्चात्य विद्या आणि शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमूल्ये रूजविली. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून ६ जानेवारी रोजी राज्यात ‘मराठी पत्रकार दिन’ साजरा केला जातो.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी अत्यंत कठीण परिस्थितीत मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची बुद्धिमत्ता अष्टपैलू होती. त्यांचे संस्कृत, मराठी, गुजराती, लॅटिन आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते. गणित व ज्योतीष या विषयाचे ते गाढे अभ्यासक होते. म्हणूनच 'दर्पण'चा अंक परिपूर्ण असे. त्या काळात या अंकाचे तीनशे वर्गणीदार होते. जवळपास साडेआठ वर्षे 'दर्पण'चा अंक निघाला. २६ जून १८४० रोजी शेवटचा अंक निघाला आणि 'दर्पण' चा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी, मोलाचे कार्य करणारे मराठी पत्रकारितेचे जनक 'दर्पण'कार,आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन