CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली नगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा 'एक दौड वीर जवानों के लिये !

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

Dombivli :क्राईम बॉर्डर टीम : रनर्स क्लॅन फाऊंडेशनची ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अर्बन अल्ट्रा मॅरेथॉन ही गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली अशी ६५ किमी अंतरासाठी होत आहे. आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र पहारा देणारे आपल्या वीर जवानांना मानवंदना देण्यासाठी 'एक दौड वीर जवानोंके लिए ' या संकल्पनेसह सदर दौड आयोजित केली आहे. ही दौड रात्री बारा वाजता सुरवात होऊन सकाळी आपल्या गंतव्य ठिकाणी पोहोचते. ही दौड चार मोठ्या शहरांतुन जात असते. रनर्स क्लॅन फाऊंडेशनचे ही दौड आयोजित करण्याचे चौथे वर्ष आहे. आणि दर वर्षी या दौडला अगदी देशपातळीवरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आणि या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात दौडसाठी नावनोंदणी झालेली आहे. त्यामुळे रनर्स क्लॅन फाऊंडेशन लवकरच म्हणजे येत्या ३१ डिसेंबर रोजी नावनोंदणी बंद करणार आहे. त्यामुळे इच्छुक धावपटुंनी लवकरात लवकर आपली नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन संस्थेमार्फत केले आहे. नावनोंदणीची लिंक पुढीलप्रमाणे आहे. www.runnersclanfoundation.in/g2dregistration.