CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवली पश्चिमेत असलेली जी एम क्रिकेट अकॅडमी ही दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांसमवेत खेळाच्या साहित्याची पूजा करून यश संपादन होण्यासाठी तसेच खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याकरिता अकॅडमीचे संचालक श्री गोपाळ श्रेयन सर हे कार्यरत आहेत.
दसऱ्याच्या दिवशी सकाळीच नऊ वाजता सदर कार्यक्रमाचे उद्घाटन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वखरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी जीएम अकॅडमी चे संचालक श्री गोपाळ श्रेयन व सर्व विद्यार्थी तसेच नागरिक व स्टाफ उपस्थित होता.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना राजेंद्र वखरे यांनी अकॅडमीचे कौतुक करत सदर अकॅडमीचे विद्यार्थी नक्कीच डोंबिवली शहराचे नाव शिखरावर नेतील असा विश्वास व्यक्त केला.