CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाण्यातील 9 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे शानदार उद्घाटन संपन्न-कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून तरुण देशाचे गौरव वाढवतील- केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे :- ठाणे जिल्ह्यातील 9 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य केंद्रामध्ये येणारा तरुण कौशल्य विकासाच्या माध्यमातून पुढील काळात देशाच्या जडणघडणीत योगदान देईल. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण कोणत्या ना कोणत्या क्षेत्राचे कौशल्य घेऊन राज्याचा देशाचा गौरव वाढविण्याचे काम करेल, असा विश्वास यावेळी भिवंडीतील कार्यक्रमस्थळी उपस्थित केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.


राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने महाराष्ट्रात 511 ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 9 केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी भिवंडी तालुक्यातील कोन येथील आटगाव शिक्षण मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसिलदार अधिक पाटील, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता केंद्राच्या सहाय्यक संचालक संध्या साळुंखे, कोन गावाच्या सरपंच रेखाताई पाटील, उपसरपंच कविता गोरक्ष भगत, आटगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम पाटील, आटगाव माध्यमिक शाळा व ज्युनिअर शाळेचे मुख्याध्यापक के.के. म्हात्रे, उपप्राचार्य मधुकर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कोन, अंबाडी, कल्याणमधील गोवेली व कांबा, मुरबाडमधील सरळगाव व म्हसा, शहापूरमधील मोखावणे व वाशिंद, अंबरनाथमधील वांगणी या ग्रामपंचायतीमध्ये स्थापन केलेल्या कौशल्य विकास केंद्रांच्या उद्घाटन समारंभास सुमारे सात हजाराहून अधिक विद्यार्थी, तरुण उपस्थित होते. या सर्व ठिकाणी प्रधानमंत्री श्री. मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या सर्व ठिकाणी विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, आयटीआयमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, तरुण, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील या कार्यक्रमात त्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानातून दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, कौशल्य केंद्राच्या माध्यमातून युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. राज्य शासनाच्या या कौशल्य विकास केंद्राचा तरुणांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. यापुढील काळात राज्यात पाच हजार कौशल्य विकास केंद्रे उभारण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील.

जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे ही कौशल्य विकासाची मंदिरे बनणार आहेत. या माध्यमातून मोठ्या संख्येने रोजगार मिळविण्यासाठीचे कौशल्य मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यात नऊ ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे स्थापन झाली आहेत. या सर्व ठिकाणी नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशा केंद्रांची जिल्ह्यात आवश्यकता आहे.

मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी आमदार श्री. किसन कथोरे, मुरबाड उपविभागीय अधिकारी श्री. रामदास दौंड, तहसिलदार श्री. संदिप आवारी, गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे, सरळगावच्या सरपंच श्रीमती. अल्काताई दिनकर, ग्रामविकास अधिकारी श्री. पी. एस. कापसे, आदी मान्यवर उपस्थित होते.

मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील कार्यक्रमाकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अविनाश फडतरे, अव्वल तहसिलदार श्री. संतोष डेरे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. गजानन सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

कल्याण तालुक्यातील कांबा येथील कार्यक्रमासाठी उल्हासनगरचे आमदार श्री.कुमार एलानी, कल्याण (पूर्व)चे आमदार श्री. गणपत गायकवाड, कल्याण तहसिलदार श्री.जयराज देशमुख, कल्याण आयटीआयचे प्राचार्य मनोज बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कल्याण तालुक्यातील गोवेली येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)श्री. गोपीनाथ ठोंबरे, कल्याण उपविभागीय अधिकारी श्री. विश्वास गुजर, ठाणे आयाटीआयच्या प्राचार्य श्रीमती स्मिता माने, गटविकास अधिकारी श्री. अशोक भवरी आदी मान्यवर उपस्थित होते.

भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी भिवंडी अतिरिक्त तहसिलदार श्री. अभय गायकवाड, नायब तहसिलदार श्री. आदेश म्हात्रे हे उपस्थित होते.
अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार प्रशांती माने, सरपंच वनिता आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

शहापूर तालुक्यातील मोखावणे येथील कार्यक्रमासाठी शहापूर गटविकास अधिकारी भास्कर रेंगाडे, निवासी नायब तहसिलदार वसंत चौधरी, मंडळ अधिकारी संदीप चौधरी, विस्तार अधिकारी राजू भोसले, ग्रामविकास अधिकारी दिनेश पकळे, तलाठी लक्ष्मण केंद्रे आदी उपस्थित होते. तसेच वाशिंद येथील कार्यक्रमासाठी जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे, अपर तहसिलदार विकास बिरादार, गटविकासअधिकारी भास्कर रेंगडे, मंडळअधिकारी लक्षमण खेडकर व तलाठी मनिषा बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राविषयी...
• कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र असे ब्रीद घेऊन राज्यातील 350 तालुक्यांमधील 511 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 511 केंद्र.
• ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण मिळणार.
• कृषीपूरक पारंपरिक व व्यावसायिक कौशल्य क्षेत्रातील प्रशिक्षण.
• पी.एम. विश्वकर्मा योजनेसाठी ही विकास केंद्र उपयुक्त ठरणार.
• या केंद्रामध्ये एकावेळेस जास्तीत जास्त 2 जॉब-रोल्सचे प्रशिक्षण प्रदान करण्यात येईल.
• अल्प कालावधीत (साधारणत: 3 महिने) पूर्ण होवू शकणाऱ्या (किमान २०० व कमाल ६०० तास प्रशिक्षणाचा कालावधी) अभ्यासक्रमाची निवड जिल्हा, कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात येईल.
• प्रत्येक प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रात वर्ष २०२३-२४ करिता एकूण 100 उमेदवारांचे प्रशिक्षणाचे उद्दिष्ट देण्यात येईल.
• प्रत्येक प्रशिक्षण केंद्रामध्ये किमान 30% महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल.
• या केंद्रातून दरवर्षी सुमारे 50 हजार युवक-युवतीं कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे रोजगारक्षम होतील.