CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : कल्याण ,कोळसेवाडी व डोंबिवलीत वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे . डोंबिवली ते सागाव ,लोढा ,निळजे पर्यंतची वाहतूक समस्या जोर धरत आहे . सागाव रस्त्यावर सिमेंट काँक्रीट ,चे काम सुरू असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने वाहनांच्या रांगांच्या रांगा लागत आहेत
आज संध्याकाळी सागाव ते डोंबिवली मधील चौफुलीवर अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेला ट्रॅफिक वॉर्डन व वाहतूक पोलीस हे दिसत नव्हते सदर विभाग हा कोळसेवाडी अंतर्गत येतो.
एकीकडे वाहतूक पोलीस वार्ड़न ची समस्या असताना शीळफाटा ,कल्याण ,लोढा ,निळजे ,काटई ते कल्याणच्या दिशेकडे वाहतूक व सुरळीत सुरू असताना वाहतूक पोलीस मध्येच टू व्हीलर वाल्यांना अडवून त्यांचे कागदपत्र बघत असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांची मानसिकता कोणत्या थराला जात आहे याचे उदाहरण दिसते.
खरोखरच ज्या गाड्या वाहतुकांचे नियमन करत नाही त्यांना पकडणे सोडून कुटुंबासहित जाणाऱ्या टू व्हीलर गाड्यांना अडवणे त्यांना कागदपत्र विचारणे ,त्यांचे लायसन्स विचारणे व त्यांच्याशी चढ्या आवाजात बोलणे ,ट्रॅफिक मधून गाड्या बाजूला घ्यायला सांगणे असे प्रकार घडत आहेत .यावर वरिष्ठांनी नियंत्रण घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
विशेषतः काटई ते सोनारपाडा मानपाडा पोलीस स्टेशन या मार्गावर असे प्रकार घडत आहेत.