CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

टॉमीच्या जाण्याने हळहळला रमेश काठे परिवार

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत राहणारे उद्योगपती तसेच नुकताच डोंबिवली येथील श्री गणेश मंदिर संस्थान च्या सभागृहात क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने आध्यात्मिक सेवा पुरस्कार 2023 ने सन्मानित व क्राईम बॉर्डर चे राज्य प्रतिनिधी श्री.रमेश झिपरु काठे हे सदग्रहस्त सुप्रसिद्ध आहेत. ते आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

गेल्या अकरा वर्षापूर्वी त्यांच्या घराच्या खाली त्यांना एक महिन्याचे कुत्र्याचे पिल्लू मिळाले ते इतके गोंडस होते की रमेश काठे व परिवाराने त्या पिलाला सुरुवातीला कुतुहलाने घरात घेतले व त्याला दूध पाजले नंतर ते काठे परिवारामध्ये इतके एकरूप झाले की काठे परिवाराला व त्या पिलाला एकमेकाशिवाय करमत नव्हते . या सर्वांनी मिळून त्या कुत्र्याचे टॉमी असे नामकरण केले. जसा जसा टॉमी मोठा होऊ लागला तस तसा तो त्यांच्या घरातील सदस्यच होऊन गेला नंतर या टॉमी ला त्यांनी शाळेत घातले त्याला उठणे ,बसणे ,रस्त्याने चालणे ,गाडीवर बसणे ,नमस्कार करणे, जेवण जेवणे अशा गोष्टी शिकवण्यात आल्या. तो कधीही कोणत्याही जेवणाच्या पदार्थांना तोंड लावत नव्हता जोपर्यंत त्याला नेमून दिलेल्या थाळीत जेवण जात नाही तोपर्यंत तो खात नव्हता. त्यानंतर तो दररोज न चुकता रमेश काठे यांच्यासोबत बाहेर हिंडायला फिरायला जाणे ,त्यांच्या गाडीवर बसणे ,देवपूजा चालू असताना त्या ठिकाणी नमस्कार करणे ,येणाऱ्या जाणाऱ्यांचे वेलकम करणे अशा गोष्टी करू लागल्याने तो सर्वांचाच प्रिय झाला होता. तो कधीच घरामध्ये घाण करत नव्हता त्याची शि शू सुद्धा तो वेळेवर आणि ठरलेल्या जागीच करायचा.

घरामध्ये रमेश काठे ,सौ भारती काठे सिद्धांत काठे यांचा तो यांचा तो लाडका बनला होता. एवढेच नव्हे तर काठे परिवाराकडे नेहमी येणारे जाणारे पाहुणे सुद्धा तो ओळखायचा. रमेश काठे यांची नात घरी आल्यानंतर टॉमी हा तिच्यासोबत खेळायचा परंतु त्याने कधीही कुणाला चावा घेतल्याचे आठवत नाही. अशा या टॉमेचे ऑक्टोबर महिन्यातील एकादशीच्या दिवशी अचानक निधन झाले.

एकादशीच्या दिवशी त्याचे निधन झाल्याने विधीवत टॉमीवर अंत्य संस्कार रमेश काठे परिवाराने त्यांच्या मुरबाड येथील फार्म हाऊस मध्ये केले असून त्या ठिकाणी ते टॉमीची आठवण म्हणून समाधी बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले .टॉमी चे निधन झाल्याने घरातील एक सदस्य कमी झाल्याचे दुःख ते व्यक्त करतात मनुष्य हा समाजप्रेमी आहे परंतु मुक्या जनावरांना सुद्धा प्रेम करावे हे यातून पाहायला मिळते.

रमेश काठे हे एक प्राणी मित्र असून ते परिसरातील भटक्या कुत्र्यांना नेहमीच खायला घालतात व आजारी असलेल्या कुत्र्यांना ते दवाखान्यात घेऊन जात असतात.