CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
निलेश चौधरी यांजकडून
वरणगांव :- ( ता. भुसावळ) वरणगांव शहरात शाळकरी मुलीची छेड काढल्याने दोन गटात तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी पोलीसांनी काही जणांना अटक केली असून , शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
वरणगांव शहरात येथे सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास शाळा सुटण्याच्या वेळेस काही मुस्लिम तरुणांनी एका अतपवयीन शाळकरी मुलीची छेड काढली असता . त्या तरुणीच्या भावाने जाब विचारले असाता पाच ते सहा मुस्लिम मुलांनी मिळून मुलीच्या भावाला बेदम मारहाण करीत जखमी केले. परिस्थितीत नियत्रणांत ठेवण्यासाठी S.D.P.O., बोदवड पोलीस , मुक्ताईनगर पोलीस, सावदा पोलीस, फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस आणि वरणगांव पोलीस स्टेशनचे आशिष अडसूळ A P I, परशुराम दळवी PSI, व राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या वरणगावात दाखल करण्यात आल्या.
मुलीच्या भावाला डोक्यात पाच ते सहा मुस्लीम मुलांनी लोखंडी रॉड मारला. व प्रकृती गंभीर असल्याने वरणगांव ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु आहे . छेडछाड प्रकरणात ३५४ कलम १२ प्रमाणे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयितांन ताब्यात घेतले आहे.
क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एन.जी.ओ.) ची टीम वरणगांव पोलीस स्टेशनला शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करीत आहे.