CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त डोंबिवली नाभिक संघटनेचे विविध कार्यक्रम संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

महाराष्ट्र नाभिक चमु

डोंबिवली : सालाबादप्रमाणे यंदाही दि. ११ सप्टेंबर २०२३ सोमवारी संत सेना महाराज यांच्या ६५३ व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ह. भ .प. हनुमंत तावरे महाराज यांच्या भजनी मंडळाने भजन सादर करून संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी व दिंडी काढण्यात आली .तसेच ह भ .प. धनंजय अमळनेरकर महाराज यांचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. युवा सेना सचिव दीपेशजी म्हात्रे समाजसेवक, प्रल्हादजी म्हात्रे, राष्ट्रीय नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष अरुणजी जाधव, सचिव महेंद्र जाधव, हेअर आर्टिस्ट बंधू चव्हाण , क्राईम बॉर्डर व महाराष्ट्र नाभिक चे संपादक /ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वखरे व मान्यवरांच्या हस्ते समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच त्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.

नाभिक समाज संघटना डोंबिवलीचे अध्यक्ष बाबासाहेब राऊत, सचिव मंगेश पोफळे ,सह-खजिनदार तुषार शिंदे ,उपाध्यक्ष रमेश वखरे ,सह-सचिव अशोक अतकरे, विश्वस्त शिवाजी वैद्य ,संतोष आवटे, संतोष शर्मा, कृष्णा कारुडकर, दशरत चित्ते , कृष्णा कदम उत्सव समिती सदस्य सोमीनाथ वरपे, महेश काशीद, संतोष खंडागळे,महेश कदम आसाराम आतकरे, जवाहरलाल परमार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .कार्यक्रमासाठी नाभिक समाज बांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.