CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

उल्हासनगर येथील बहुचर्चित विजय लक्ष्मी ज्वेलर्स वरील धाडसी घरफोडीचा गुन्हा ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाकडून उघड तीन आरोपी गजाआड

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे : उल्हासनगर विजय लक्ष्मी ज्वेलर्स झवेरी बाजार येथील दि. २७ जून रोजी अनोळखी आरोपींनी धाडसी घरपोडी करून तब्बल ३ कोटी २० लाख किमतीचे सहा किलो सोन्याचे दागिने चोरी करून नेले होते. त्या अनुषंगाने उल्हासनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३८७/२०२३ भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८०,३८१,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता . भर बाजारात गर्दीच्या ठिकाणी मोठी आणि धाडसी घरपोडी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेस प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळून त्याबाबत बरीच चर्चा झाली होती . त्यासाठी सदर गुन्हा उघड करण्यासाठी पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेकडून वेगवेगळे पथके बनवली होती. यातील आरोपी हे नेपाळमधील असल्याबाबत प्राथमिक माहिती असल्याने गुन्हा दाखल झाल्यापासून यातील आरोपी हे प्रयत्न करून सुद्धा मिळून येत नव्हते त्यामुळे हा गुन्हा उघड करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर होते.

गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखा यांचे पथकाने त्याबाबत समांतर तपास करून सदर आरोपी यांच्याबाबत तांत्रिक माहितीच्या आधारे आणि अत्यंत कुशलतेने तपास करून यातील आरोपी निष्पन्न करून त्यांचा लखनऊ , बनारस , नेपाळ- भारत सीमा वरती भागात शोध घेऊन अथक परिश्रमानंतर यातील १) माधव चुन्नालाल गिरी २) दिनेश उर्फ सागर चंद्र रावल ३) दीपक रामसिंग भंडारी सर्व राहणार नेपाळ यांना अटक करण्यात आली आहे.

नमूद आरोपी यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्यांचे कडून ५५० ग्रॅम वजनाचे ३३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत . उर्वरित आरोपीत यांचा शोध चालू असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहेअटक करण्यात आलेले आरोपी हे अशा प्रकारचे गुन्हे करण्यास सराईत असून त्यांनी कामोठे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर २३२/२२ भा.द.वि.४५४,४५७,३८०,३८१,३४ प्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांच्यावर यापूर्वी मध्य प्रदेश, गुजरात ,कर्नाटक येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

सदर कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजित सिंह ,पोलीस सह . आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले (गुन्हे), पोलीस उपायुक्त शिवराज पाटील (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे (शोध १ गुन्हे शाखा) , सहायक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे (शोध २ गुन्हे शाखा) यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, सहायक पोलीस निरीक्षक महेश जाधव ,पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल प्रधान, पोलिस अंमलदार संदीप भालेराव ,प्रशांत भुर्के , राजेंद्र घोलप, अर्जुन करळे , राजाराम शेगर ,रुपवंत शिंदे ,किशोर भामरे, नगराज रोकडे ,राजकुमार राठोड ,नवनाथ कोरडे ,सदन मुळे आणि महिला पोलीस अंमलदार अशा गोळे , गीताली पाटील यांनी परिश्रम घेतले.