CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
CRIME BORDER NEWS NETWORK
डोंबिवली : कोरोना विषाणूच्या (corona virus) संकटकाळात घरकाम (House work) करणाऱ्या अनेक महिला कामगारांची (Woman Maid) होरपळ झाली आहे. कोरोनाच्या भीतीनं अनेकांनी घरकाम करणाऱ्या महिलांना सुट्टी दिली आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगार (Unemployed) होण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे घरकाम करणाऱ्या महिला कोरोना विषाणूबाबत योग्य काळजी घेतात की नाही ? यामुळे अनेकजण भयभीत झाले होते.या दोन्ही बाजूंची समस्या लक्षात घेऊन आश्रय महिला संस्थेनं अनोखं स्टार्टअप सुरू केलं आहे. त्यामुळे अनेक असंघटीत कामगार महिलांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला आहे.
सोबतच शहरातील शेकडो लोकांना कोरोना प्रादुर्भावाबद्दल योग्य माहिती असणारी महिला घरकामासाठी उपलब्ध झाली आहे.कोरोना काळात घरकाम करणारी मावशी योग्य काळजी घेतात का ? कोरोना बाबतची साफसफाई त्यांना करता येते का ? तसेच मावशींना कोरोना तर नाही ना ? अशा अनेक समस्या नागरिकांना पडत होत्या.अशा सर्व समस्यांचं उत्तर आश्रय महिला संस्थेनं दिलं आहे.तसेच घरकाम करणाऱ्या या असंघटित महिलांना संघटित करण्याचा प्रयत्नही केला आहे.
32 वर्षांहून अधिक काळ सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात प्रत्यक्ष काम करत असतांना राजेंद्र वखरे आणि त्यांच्या पत्नीसौ. सीमा वखरे यांनी दि.२ ऑक्टोबर २०२१ मध्ये हे अनोखं स्टार्टअप सुरू केलं आहे.या स्टार्टअपचं नाव वूमन मेड इझी (Woman maid easy) असं आहे.या स्टार्टअपच्या माध्यमातून श्री.व सौ.वखरे यांनी कल्याण डोंबिवली परिसरातील महिला घरकामगार,आया,पॅरामेडिकल स्टाफ यांनी आश्रय महिला संस्थेच्या कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ.सीमा वखरे यांनी केले आहे.
या स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक घर कामगार महिलांना संघटित करण्याच काम सुरू आहे.भविष्यात या असंघटित महिलांसाठी अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येणार आहेत.त्याचबरोबर घरकाम करण्यापासून कामाच्या ठिकाणी कसं वागावं, याचं प्रशिक्षणही संस्थेकडून देण्यात येते. तसेच कामावर रुजू होण्यापूर्वी संबंधित महिला कामगाराची वैद्यकीय तपासणी केली जाते. गरज पडल्यास संबंधित महिलेची पोलीसांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील तपासली जाते. किती आणि काय काम आहे, त्यानुसार महिलांना पगार पुरवला जातो.अशा महिला कामगारांमुळे अनेक नागरिकांची गैरसोय कमी झाली आहे.
गरजू,बेरोजगार, घरकाम करणाऱ्या महिला घरकामगार , आया , पॅरामेडिकल स्टाफ यांनी संस्थेच्या अध्यक्षा सौ.सीमा वखरे, कार्यालय - आई द्रौपदा बिल्डिंग ३०४,साई बाळाराम कॉम्प्लेक्स समोर ,शंखेश्वर पाम्स जवळ ,खंडोबा मंदिर रोड ,डोंबिवली (पश्चिम ), तसेच मोबाईल नंबरवर किंवा प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधावा - ९९८७४९६१३६ / ९६१९६३००३५ असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे.