CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : रामनगर पोलीस ठाणे गु. र. क्र. २८९/२३ कलम ३८०,३४ भादंवि मधील फिर्यादी पूजा गुप्ता राह. मुलुंड वेस्ट मुंबई यांचा, दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी सायं ७. ३० वा दरम्यान घरडा सर्कल येथील बँक्वेट हॉल डोंबिवली येथे साखरपुडा कार्यक्रम सुरु असताना त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेले त्यांचे सोन्याचे इअर रिंग्स, गळ्यातील सोन्याची चैन आणी ५०००/- रुपये कॅश असे एकूण ७०,०००/-किंमतीचा मुद्देमाल चोरी केला म्हणून वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदर गुन्ह्याचा तपास सपोनि सानप, पोहवा सरनाईक, पोहवा कुरणे, पो अं पोटे, मपोहवा सूर्यवंशी हे करत असताना नमूद गुन्हाचे घटनास्थळाचे CCTV फूटेज तपासणी केली असता त्यात फिर्यादी यांचा मेकअप करण्यासाठी आलेल्या महिला कल्पना राठोड व अंकिता इंगळे उर्फ अंकिता परब या संशयित रित्या बाहेर पडत असताना मिळून आल्या. त्यांचे मोबाईल चे तांत्रिक तपासाच्या आधारे दावडी सोनारपाडा डोंबिवली पूर्व परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यातील दागिने व 3000/- रुपये असे एकूण 68,000/-चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या गुन्ह्यात कल्पना राजेश राठोड वय 43 वर्षे धंदा - मेकअप आर्टिस्ट राह.मालाड पूर्व मुंबई 2)अंकिता करण परब उर्फ अंकिता इंगळे 29वर्षे व्यवसाय - मेकअप आर्टिस्ट राह, नालासोपारा, पालघर यांना अटक करण्यात आली आहे .
एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वपोनिरी . नितीन गीते यांच्या नेत्तृत्वाखाली कारवाई पथक - सपोनि योगेश सानप ,म पो उप नि आशा निकम ,पोहवा - प्रशांत सरनाईक, दत्ता कुरणे,पो अं देविदास पोटे, महिला पो. हवा. आशा सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.