CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कल्याण क्राईम ब्रँच युनिट -३, ची धडक कारवाई ८७ लाखाहून अवैद्य गुटखा जप्त

CRIME BORDER | 25 December 2025 | 11:36 PM

कल्याण क्राईम ब्रँच युनिट -३, ची धडक कारवाई ८७ लाखाहून अवैद्य गुटखा जप्त

Chief Editor : Rajendra Vakhare /  Editor : Seema Vakhare

डोंबिवली : गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात अवैद्य गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आरोपींच्या मुस्क्या आवळण्यात कल्याण गुन्हे शाखा युनिट -३, च्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. या कारवाई दरम्यान पोलीसांनी तब्बल ८७,३७,४७२/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ठाणे क्राईम ब्रांच युनिट -३, कल्याण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की,] गुजरात राज्यातून आयशर टेम्पो मधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक होत आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गांधारी ब्रीज चौक कल्याण पश्चिम या ठिकाणी पोलीसांनी सापळा रचला . या सापळ्यात धनराज रामगोपाल स्वामी राहणार राजस्थान हा इसम आयशर टेम्पोतून अवैद्य गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ वाहतूक करतांना पोलीसांच्या हाती लागला. तपासादरम्यान पोलीसांनी त्याच्याकडून 87 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल आणि आयशर टेम्पो जप्त केला.

या संदर्भात सदर इस्मविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३८/२०२५ भा.न्या.सं. चे कलम १२३,२२३,२७४,२७५,३(५) तसेच अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मधील विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास फौजदार विनोद पाटील ठाणे क्राईम ब्रँच कल्याण युनिट शाखा तीन हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

या गुन्ह्या संदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय सर्जेराव पाटील , फौजदार विनोद पाटील , किरण भिसे,ए एस आय  दत्ताराम भोसले,  बालाजी शिंदे व पोलीस कर्मचारी पो.हवा. सुधीर कदम, विजय हिरे , प्रशांत वानखेडे, सचिन भालेराव ,गोरक्षनाथ पोटे, विलास कडू , आदिक जाधव, पांडुरंग भांगरे ,उल्हास खंदारे ,सचिन कदम ,पो. ना. प्रवीण किनरे, पो..ना . दीपक महाजन,पो. शि .  मिथुन राठोड, सतीश सोनवणे, गुरुनाथ जरग, विनोद चेन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे यांनी परिश्रम घेतले.