CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
कल्याण : आपली संस्कृती कोणत्या थरावर जात आहे ?. आताच्या पिढ्या वासनेच्या आहारी जाऊन नको ते चाळे करताना समाजात चोहीकडेच दिसत आहेत परंतु आता आपल्या शहरातच नव्हे तर दररोज आपण कुठे ना कुठे बलात्काराच्या घटना घडत असल्याचे वाचत असतो, बघत असतो परंतु आता तर कल्याण मध्ये घडलेल्या घटनेने हद्दच सोडली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कल्याण शहरांमध्ये खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक माणूसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून यामध्ये निरागस अवघ्या दोन वर्षीय बालिकेवर शेजारीच राहत असलेल्या एका पंधरा वर्षाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.प्रमिला ही आपल्या कुटुंबासह कल्याण पश्चिमेतील एका इमारतीमध्ये रहायला आहे .प्रमिलाच्या शेजारीच एक कुटुंब रहायला आहे त्या कुटुंबामध्ये एक पंधरा वर्षीय मुलगा राहायला असून तो प्रमिलाच्या घरी अधून मधून जात येत असायचा.
त्यादिवशी प्रमिलाने त्या मुलाला दुकानातून साखर आणायला पाठवले होते . त्या दिवशी ३ ऑगस्ट २०२३ ही तारीख होती . सायंकाळच्या सुमारास प्रमिलाने त्याला दुकानातून साखर आणण्यासाठी पाठवले होते ताबडतोब तो मुलगा दुकानांमध्ये केला व साखर घेऊन आला. त्याने प्रमिलाला साखर दिली . ती साखरेची पुडी घेऊन प्रमिला आत किचनमध्ये गेली. घरामध्ये प्रमिलाच्या व्यतिरिक्त तिची दोन वर्षाची मुलगी एकटीच खेळत होती तर तिची आई किचनमध्ये तिच्या कामात व्यस्त झाली घराचा दरवाजा उघडाच होता. त्या मुलाने साखर आणून दिल्यानंतर तो त्या दोन वर्षाच्या मुली सोबत खेळू लागला परंतु खेळता खेळता त्याला त्याची काम वासना जागृत झाल्याने त्याने आजूबाजूला कोणीच नसल्याचे पाहून त्या मुलाने त्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार सुरू केला. ती बालिका त्या प्रकाराने घाबरून रडू लागली तिने जोरजोरात आरडाओरडा सुरू केल्याने त्या मुलाने तेथून फळ काढला. आपली मुलगी का रडत आहे हे पाहण्यासाठी तिची आई किचनमधून बाहेर आली तेव्हा तिने पटकन तिच्या मुलीला जवळ घेतले परंतु ती रडतच होती काय करावे हे तिला सुचत नव्हते .
तिने तात्काळ दरवाजा लावून मुलीला जवळच असलेल्या एका दवाखान्यात नेले डॉक्टरांनी तिला चेक केले असता एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तसेच हा प्रकार एक दोनदा नव्हे तर बऱ्याच वेळा घडला असल्याचे समोर आले. तात्काळ प्रमिलाच्या लक्षात आले की हा प्रकार आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलानेच केला आहे. हे त्यांना समजायला वेळ लागला नाही. त्यांनी तात्काळ सदर घटना कुटुंबीयांच्या लक्षात आणून दिली तेव्हा त्या सर्वांनी त्या मुलांच्या विरोधात तक्रार देण्याचे ठरविले पीडित मुलीची आई व कुटुंब हे ४ ऑगस्ट २०२३ रोजी कल्याण पश्चिम येथील खडकपाडा पोलीस ठाण्यात गेले व त्यांनी सदर घटना पोलिसांना सांगितली व त्या मुलाच्या विरोधात तक्रार दिली.
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे त्या मुलाला ताब्यात घेतले खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन वर्षाच्या बालिकेवर पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर भारतीय दंड विधान कायदा कलम ३७६(३),३७६(आ),(ब) आणि फॉक्स कलम ४,६,८,१०,१२ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले असून त्याला भिवंडी येथील बाळ सुधार गृह गृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.