CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे, :- विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयातर्फे 'अभिव्यक्ती मताची' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयाच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
'अभिव्यक्ती मताची' या विषयांतर्गत जाहिरातनिर्मिती, भित्तिपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मिडीया व जर्नलिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालये (आर्ट कॉलेज) येथील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचा कालावधी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 हा आहे. तीनही स्पर्धेचे विषय आणि नियमावल्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/competitions.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. 1.युवा वर्ग आणि मताधिकारी, 2. मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, 3. एका मताचे सामर्थ्य, 4. सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका / जबाबदारी, 5. लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार असे असून तीनही स्पर्धाचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे.
या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. १.जाहिरातनिर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक रू.१,००,०००/-, दुसरे पारिताषिक रू.७५,०००/-, तिसरे पारितोषिक रू.५०,०००/- आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रु.१०,०००/- रूपयांची आहेत.
2. भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक रू.५०,०००/-, दुसरे पारितोषिक रू. २५,०००/-, तिसरे पारितोषिक रू.१०,०००/- आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रु.५,०००/- रूपयांची आहेत.
३. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक रु.२५,०००/-, दुसरे पारितोषिक रू.१५,०००/-, तिसरे पारितोषिक
रू.१०,०००/- आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रु.५,०००/- रूपयांची आहेत.