CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अवयवदान चळवळ तरुण पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे.....डॉ नरेशचंद्र अखंड महादान पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : " अवयवदान चळवळ समाजात रुजली पाहिजे यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. 'अखंड महादान' हे पुस्तक समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आजच्या तरुण वर्गात याबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. महाविद्यालयात या विषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे." असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ नरेशचंद्र यांनी डॉ योगेश जोशी यांनी संपादित केलेल्या अखंड महादान पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी केले.

फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी हसत्या खेळत्या वातावरणात अवयवदानाचे महत्त्व विविध उदाहरणे व प्रसंग सांगून आपल्या भाषणातून समजावून सांगितले. " नेत्रदान , त्वचादान करण्यासाठी लोक घाबरतात, त्यांना चेहरा विद्रूप होईल याची भीती वाटत असते. अवयवदान व देहदान विषयक लोकांचे मनात अनेक गैरसमज आहेत अनेक शंका आहेत त्यामुळे लोक अवयव दान करायला घाबरतात त्यामुळे ते पुढे येत नाहीत." यावर भाष्य करून लोकांच्या मनातील शकांचे निरसन केले. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर फेडरेशन उपाध्यक्ष सुनील देशपांडे , जी डब्लू एफ स्पेशल कमिटी मेंबर गगन जैन , जी डब्लु एफ स्पेशल कमिटी मेंबर मनोहर पालन , डायरेक्टर ऑर्गन डोनेशन डॉ कमल जैन , जेष्ठ समाजसेवक डॉ विजय पंडित , जायंट फेडरेशन वन सी प्रेसिडेंट आशिष खंडेलवाल , कल्याण मेनचे प्रेसिडेंट सुरेशभाई सूचक अग्रवाल कॉलेजच्या डॉ वर्षा बोबडे, अनघा राणे या पाहुण्यांनी समयोचीत भाषणे करून उपस्थितांना अवयवदान विषयक मार्गदर्शन केले.



पुस्तकाचे संपादक व प्रकाशक डॉ योगेश जोशी यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. तसेच पुस्तकात लेखक म्हणून योगदान दिलेल्या मान्यवर लेखकांचा आणि पुस्तकासाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या मान्यवरांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी जायंट ग्रुपच्या कल्याण , डोंबिवली , उल्हासनगर , भिवंडी शाखेचे पदाधिकारी , कल्याणातील नामवंत डॉक्टर, पत्रकार , शिक्षक आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मेन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रकाशन समारंभाचे आयोजन नागराजन अय्यर, डॉ योगेश जोशी आणि प्रमोद जोशी यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागराजन अय्यर तर आभार प्रदर्शन ॲड यतीन गुजराथी यांनी तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ प्रकाश माळी यांनी केले. अनुराधा भुजबळ यांनी सुनील देशपांडे यांनी लिहिलेले अवयवदान विषयक पसायदान सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.

अखंड महादान पुस्तकामध्ये सुनील देशपांडे , पुरुषोत्तम पवार, डॉ कामाक्षी भाटे, प्रशांत पागनीस , डॉ रवी वानखेडे, चंद्रशेखर मेनन , डॉ निर्मल मंडल, डॉ भाऊसाहेब मोरे , जया जयरामन, हेमंत नेहते , डॉ संगिता नाईक , प्रा प्रशांत कुचेकर, डॉ प्रकाश माळी, आरती मुळे , हिरामण क्षीरसागर, आरती कुलकर्णी, डॉ योगेश जोशी आदी मान्यवरांचे अवयवदान, देहदान, रक्तदान विषयक, लेखन प्रकाशित करण्यात आहे. सदर पुस्तक शाळा महवियालय , रुग्णालये , डॉक्टर आणि यांना विनामूल्य देण्यात येणार आहे.