CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे :- जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे कार्यालयातील निरुपयोगी जुने साहित्य व वृत्तपत्र रद्दी विहित पध्दतीचा अवलंब करुन विक्री करावयाचे आहे.
तरी इच्छुक भंगार व रद्दी खरेदीदाराने वस्तूंचे खरेदी निविदा/दरपत्रक मोहोरबंद लखोट्यात भरुन त्यावर "निर्लेखित वस्तू निविदा/दरपत्रक" असा स्पष्ट उल्लेख करुन जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे, स्टेट बँक ऑफ इंडिया इमारतीवर, जिल्हाधिकारी आवार, कोर्ट नाका, ठाणे येथे दि. 3 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जमा करावे. नमूद दिनांक व वेळेनंतर आलेल्या निविदा/दरपत्रक स्वीकारले जाणार नाहीत.
विक्रीसाठीचे निर्लेखित निरुपयोगी जुने साहित्य व वृत्तपत्र रद्दी दि.2 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत सकाळी 9.45 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस सोडून)प्रत्यक्ष पाहाण्यास उपलब्ध करुन दिले जाईल.
निवड झालेल्या निविदाधारकास संपूर्ण रक्कम भरणा केल्यानंतर सबंधित वस्तू त्यांच्या ताब्यात देण्यात येतील.
दरपत्रक/निविदा मंजूर अथवा नामंजूर करण्याचे सर्व अधिकार समिती अध्यक्ष तथा जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांनी राखून ठेवले आहेत,असे ठाणे जिल्हा माहिती अधिकारी यांनी कळविले आहे.