CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

भिवंडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत मोहरम(ताजिया) सणानिमित्त वाहतुकीत बदल

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे :- भिवंडी वाहतूक उप विभागात दि.२९ जुलै २०२३ रोजी मोहरम (ताजिया) सणानिमित्त मुस्लिम बांधवातर्फे भव्य मिरवणूक काढण्यात येत असून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव सामील होत असतात. मिरवणुकीच्या वेळी या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग, पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे :-

प्रवेश बंद :- मुंबई / ठाणे / मानकोली कडून जुना ठाणे आग्रा रोडने भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या

जड-अवजड वाहनांना अंजूरफाटा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग :- ही जड-अवजड वाहने वसई रोडने कारिवली जकात नाका व वीट भट्टी मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :- मुंबई/ ठाणे कडून जुना ठाणे-आग्रा रोडने अंजूरफाटा येथून भिवंडी शहरात येणाऱ्या टी.एम.टी./एस.टी. / सर्व प्रकारच्या बसेस व हलक्या वाहनांना नारपोली पोलीस स्टेशन येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग :- टी. एम. टी. / एस. टी. / सर्व प्रकारच्या बसेस नारपोली पोलीस स्टेशन येथे प्रवासी उतरवतील व तेथूनच प्रवासी भरून इच्छित स्थळी जातील व हलकी वाहने देवजीनगर अथवा साईनाथ सोसायटी कामतघर रोडने इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :- रांजनोली नाक्याकडून भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, मध्यम व हलक्या (कार. रिक्षा, दुचाकी सह) वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- ही जड, मध्यम व हलकी वाहने रांजनोली नाका येथून वळसा घेवून मुंबई-नाशिक बायपास हायवे वरून माणकोली नाका-अंजूरफाटा-वसई रोडने ओवळी खिंड-ओवळी गाव, ताडाळी जकात नाका, पाईपलाईन रोडने इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :- एस.टी./ के.डी.एम.टी. बसेसना रांजनोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- एस.टी./ के.डी.एम.टी. बसेस रांजनोली नाका येथे प्रवाशी उतरवतील व तेथूनच प्रवासी भरून इच्छित स्थळी जातील व इतर वाहने रांजनोली नाका येथूनच वळसा घेवून परत जातील.

प्रवेश बंद :- वाडा रोडने नदीनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना पारोळफाटा (नदीनाका) येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग :- ही वाहने अंबाडी नाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ ने अथवा बृहन्मुंबई महानगरपालिका पाईपलाईनने इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :- वाडा रोडने नदीनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व हलक्या वाहनांना मेट्रो हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग :- ही हलकी वाहने मेट्रो हॉटेल येथे उजवे वळण घेवून संगमपाडा रोड-अजयनगर पर्यंत येवून इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :- वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना एस.टी. बसेससह धामणगाव जांबोळी पाईपलाईन नाका व चाविंद्रा नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग :- सर्व प्रकारची वाहने धामणगाव पाईपलाईन येथे उजवे वळण घेवून पाईपलाईन मार्गे वाड्याकडे व पुढे इच्छित स्थळी जातील. तसेच एस. टी. बसेस चाविंद्रा जकात नाका येथे प्रवासी उतरवतील व तेथूनच प्रवासी घेवून बस वळवून इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :- छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून बाजारपाटी नाका मार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग :- ही वाहने अजयनगर-संगमपाडा-मेट्रो हॉटेल डावीकडे वळून वंजारपाटी ब्रिज वरुन इच्छित स्थळी जातील.

ही अधिसूचना मोहरम (ताजिया) सणाच्या दिवशी दि. २९जुलै २०२३ रोजी दुपारी २ ते ९ वाजेपर्यंत अंमलात राहील. ही अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, ग्रीन, कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने यांना लागू राहणार नाही, असेही वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी कळविले आहे.